23 November 2017

News Flash

हा पठ्ठ्या रोज पिझ्झा खातो; तरीही वजन कमीच!

वर्षभर फक्त पिझ्झावर

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 14, 2017 2:11 PM

वर्षभर पिझ्झा खाऊनही वजन न वाढलेला ब्रायन नॉर्थप

रोज पिझ्झा खायचा, हे ऐकूनही अनेकांच्या तोंडाला पाणी सुटले असेल. दिवसाच्या कोणत्याही वेळेला कितीही पिझ्झा खाऊ शकणाऱ्या पिझ्झाप्रेमींची संख्या आपल्याकडे मोठी आहे. पिझ्झासारखे जंक फूड आरोग्यासाठी हानीकारक आहे, असे अनेकांकडून सांगितले जाते. या पदार्थांध्ये अतिरिक्त प्रमाणात असणारा मैदा, चीज, तेल आरोग्यासाठी हानिकारक असल्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो, असा सल्लाही अनेक तज्ज्ञ देतात. मात्र डॉक्टर, आहारतज्ज्ञ आणि फिटनेस गुरुंकडून सांगितल्या जाणाऱ्या या उपदेशाला हरताळ फासत ब्रायन नॉर्थप याने रोज पिझ्झा खाऊनही वजन कमी होऊ शकते, हे सिद्ध करुन दाखविले आहे.

आता हे कसे शक्य आहे? तर रोज पिझ्झा खाण्याबरोबरच तो भरपूर व्य़ायामही करत होता. त्यामुळे साहजिकच पिझ्झामुळे शरीरात वाढणाऱ्या अतिरिक्त कॅलरीज आणि फॅटसचे प्रमाण संतुलित राखले जायचे आणि त्याचे वजन वाढले नाही तर उलट ते योग्य त्या प्रमाणात झाले. आपल्या या अनोख्या उपक्रमाबाबत ब्रायन म्हणतो, आहार हा व्यक्तीनुसार बदलत असल्याने प्रत्येक व्यक्तीने आपल्या प्रकृतीनुसार आहार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही काय खाऊ नये यापेक्षा तुमच्या शरीराला कोणत्या गोष्टींची गरज आहे हे लक्षात घ्यायला हवे. यामध्ये ब्रायन प्रसिद्ध अॅथलिट मायकल फिलिप याचाही दाखला देतो. तोही रोज पिझ्झा आणि इतर जंकफूड खाऊनही इतकी उत्तम कामगिरी करत असल्याचे तो सांगतो. ब्रायनने आपला वर्षभराचा हा प्रवास इन्स्टाग्रामवर शेअर केला असून आपले पिझ्झाबरोबरचे बरेच फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. त्यामुळे पिझ्झाप्रेमींना यामुळे नक्कीच प्रेरणा मिळेल. मात्र, त्याचवेळी ब्रायन त्यासाठी जीममध्ये घेतलेल्या मेहनतीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.

#PIZZAPOCALYPSE THE FINAL PHYSIQUE: An ENTIRE @dominos pizza EVERY DAY for a leep year and a day (367 total) Recorded yesterday on day 367/367 The #PIZZAPOCALYPSE is complete. My final weigh in was 161.2 lbs. For comparison, my weigh in on day 1 was 167.1 lbs. I LOST 5.9 lbs eating an entire pizza every day for a year. In addition, I've increased my strength, speed, AND (most important to me) my cardiovascular endurance over the course of this endeavor. Also, I haven't been sick for a single day of this experience, nor have I injured myself a single time. Still behind on editing the final videos, but very open to ideas on where to go next, both here and on my YouTube channel (just search my name if you're not following me there yet but are interested). So PLEASE, hit me up with ideas. Eating challenges, Fitness videos, Reviews or Perspectives on anything Superhero/Comicbook/GoT/Fantasy related, videos on mindset, etc. Anyways, that's it. Thank you SO MUCH to all you Pizza Lovers out there who have been with me on this quest of deliciousness! Mischief Managed.

A post shared by 🍕Lord of Pizza🍕 (@brian.northrup) on

ब्रायन म्हणतो, मी नेहमीच व्यायाम आणि आहाराबाबत वेगळ्या पद्धतीने विचार करत आलोय. त्यामुळे सुरुवातीपासूनच मला आपण काही वेगळे करतोय असे वाटले नाही. मी जास्त खातो म्हणजे जास्त व्यायाम करेन आणि जास्त व्यायाम केला की जास्त खाता येईल. मात्र कॅलरी घटवणे हे माझ्या व्यायाम करण्याचे कधीच ध्येय नव्हते. त्याच्या व्यायामाचे रुटीनही त्याने विशिष्ट पद्धतीने आखले होते. यामध्ये तो आठवड्यातील ३ ते ४ दिवस ३० ते ४० मिनिटे वेट ट्रेनिंगशी निगडीत व्यायाम करत होता. तर दिवसातील २ ते ३ तास तो कार्डिओ व्यायामही करत होता.

First Published on September 14, 2017 2:11 pm

Web Title: guy ate pizza everyday for a whole year and still managed to lose weight