अगदी इंटरनेट कनेक्शन सुरु आहे की नाही हे तपासण्यासाठी गुगल सर्च करण्यापासून ते एखादा पत्ता शोधण्यापर्यंत कोणतीही गोष्ट शोधायची असल्यास डोळ्यासमोर येते ते म्हणजे गुगल. आज याच गुगलचा आज २१ वा वाढदिवस. गुगलमुळेच जगाच्या पाठीवरील कोणतीही गोष्ट आपल्याला माहित नसणारी एखादी गोष्ट शोधणे हल्ली सोपे झाले आहे. एखादा रस्ता शोधण्यापासून ते जगाच्या पाठीवरची कोणतीही माहिती मिळविण्यासाठी गुगल आपल्या दिमतीला हजर असते. गुगलने अनेक अर्थाने आपले आयुष्य सोपे केले आहे असे म्हणता येईल. गुगलप्रमाणे अनेक सर्च इंजिन आली, मात्र गुगलपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. याच गुगलबद्दल जाणून घेऊयात काही खास गोष्टी…

१)
२७ सप्टेंबर १९९७ रोजी कंपनीने डोमेन रजिस्टर केले आणि ४ सप्टेंबर १९९८ रोजी गूगल पहिल्यांदा जगासमोर आले. पण तरीही तारखेवरुन वाद कायम होता. त्यानंतर १७ व्या वाढदिवसापासून २७ सप्टेंबरलाच गुगल अधिकृतपणे आपला वाढदिवस साजरा करु लागला. त्यानुसार आज गुगलचा २१ वा वाढदिवस आहे.

२)
१९९८ मध्ये पहिल्यांदा जगासमोर आलेल्या गुगलचे सुरुवातीचे नाव होते बॅकरब. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन या संशोधकांनी गुगलची निर्मिती केली.

३)
लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांनी गुगलची स्थापना केली.

४)
२००२ साली गूगलने पहिल्यांदा डूडल तयार केले. जगप्रसिद्ध व्यक्तींची जयंती-पुण्यतिथी, महत्त्वाचे कार्यक्रम, महत्त्वाचे वर्धापनदिन इत्यादींसाठी गूगल आपल्या होमपेजवर डूडल प्रसिद्ध करते.

५)
सुरुवातीला फक्त दुसऱ्या वेबसाईट्सचे डिटेल्स पुरवल्या जातील, अशी गुगलची कार्यप्रणाली होती. त्यामुळेच त्याचे नाव ‘बॅकरब’ असे होते.

६)
४ सप्टेंबर १९९८ रोजी टायटॅनिक जहाजाचे ७३ सालापूर्वीचे फोटो सापडल्यामुळे गुगल पहिल्यांदा जगासमोर आले होते. शोधण्यात आलेली वेबसाईट किती महत्वाची आहे हे जाणून घेण्यासाठी ते बॅक लिंक्स पद्धतीबरोबरच त्या साईटशी संबंधित इतर साईट्सचा वापर करत असत. त्यामुळे त्याचे नाव बॅकरब असे ठेवण्यात आले. बॅकरब हे जोपर्यंत कमी ब्रॅण्डविड्थ वापरत होते तोपर्यंत ते स्टॅण्डफर्डचाच सर्व्हर वापरत होते.

७)
या कंपनीचा व्याप वाढत गेला तशापद्धतीने त्यांनी आपल्या तंत्रज्ञानामध्ये बदल केला. त्यांनी एक असा प्लॅटफॉर्म बनवला जिथे जगभरातील माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. त्यावरूनच सुरूवात झाली ‘एका क्लिकवर सर्व काही’ या संकल्पनेची.

८)
बॅकरब हे नाव तितकेसे चांगले नसल्याचे लक्षात आले. मग आहे ते नाव बदलून काय ठेवायचे यावर बरीच चर्चा आणि विचारविनिमय झाला. अखेर गणितातील googol या संकल्पनेवरुन हे नाव ठेवण्यात आले. googol याचा अर्थ एकावर १०० शून्य असा होतो. म्हणजेच एक गोष्ट शोधल्यावर १०० गोष्टी सापडतील असे. मग याचेच पुढे Google झाले.

९)
अनेकांच्या मते नाव नोंदणी करताना झालेल्या चुकीमुळे कंपनीचे नाव Googol ऐवजी Google असे नोंदवले गेले आणि तेच नाव नंतर वापरण्यात आले. जगभरात असलेली माहिती योग्य पद्धतीने विश्लेषण करुन नेटकऱ्यांना उपलब्ध करुन देणे हा कंपनीचा सुरुवातीला मुख्य उद्देश होता. त्यानंतर कंपनीने आपल्या वेगवेगळ्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केली.

१०)
गुगलने १ एप्रिल २००४ रोजी जीमेल सेवा सुरु केली. अनेकांना हा दिवस एप्रिल फूल्स डे असल्याने गुगलने केली घोषणा मस्करी असल्यासारखे वाटले होते.