News Flash

Teachers Day 2020 : हे मीम्स पाहून तुम्हाला शाळेतील दिवस आठवतील

शनिवार देशात शिक्षक दिवस साजरा होत आहे

Happy Teachers Day 2020 : देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि महान शिक्षक डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस (५ सप्टेंबर) शिक्षक दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. महाविद्यालय आणि शाळेत शिक्षक दिनाच्या दिवशी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. ज्यामध्ये विविध कार्यक्रम असतात ज्यातून शिक्षकांना सन्मान आणि आदार मिळतो.

आपल्यापैकी अनेकांना शाळेत किंवा महाविद्यालयात साजरा केलाला शिक्षक दिन आठवणीत राहतो. तो खास दिवस नेहमीच मनाच्या कोपऱ्यात घर करुन गेलेला असतो. या दिवसाला आठवून आपण आनंद साजरा करत असतो. यंदा शनिवारी शिक्षक दिवस आला आहे. अनेकजण आपल्या आवडत्या शिक्षकाला मेसेज किंवा भेटवस्तू देऊन अथवा फोनद्वारे शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतील.

पण काही अशा गोष्टीही आहेत, ज्या देशातीलच नव्हे तर विदेशातील लोक शाळेत असतानाचे दिवस आणि शिक्षकांना आठवत आहेत. विद्यार्थ्यांच्या आयुषात खूप गोष्टी घडत असतात. त्यामध्ये शिक्षकांचाही वाटा महत्वाचा असतो. शाळेत असताना प्रत्येक विद्यार्थी अशा काही गोष्टी करत असतो की, त्याला त्या आयुष्यभर आठवणीत राहतात. याच कडू-गोड आठवणी आठवून शाळेतील दिवसांची मज्जा-मस्ती डोळ्यांसमोर येते. शाळेत असताना रिकाम्यावेळी आपण केलेल्या काही उटपटांग गोष्टींमुळे शिक्षक ओरडतात. कधीकधी अशा चुकामुळे सर्वांसमोर शिक्षाही होते. सध्या सोशल मीडियावर अशाच प्रकारचे मीम्स व्हायरलहोत आहे. जे विद्यार्थी असताना प्रत्येकानं कधीकधी केले असतील. हे मीम्स पाहून तुम्हाला शालेय जिवनाची नक्कीच आठवण येईल अन् तुमच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलेलं असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 4:14 pm

Web Title: happy teachers day 2020 these memes will take you on a trip down memory lane nck 90
टॅग : Teachers Day
Next Stories
1 Viral Video : सुसाट गाड्यांमुळे कुत्र्याला ओलांडता येत नव्हता रस्ता, तेवढ्यात गेलं ट्रॅफिक पोलिसाचं लक्ष आणि…
2 वाह रे पठ्ठ्या!…. समाधानासाठी इंजिनिअरची नोकरी सोडून उघडली चहाची टपरी
3 “आता Pochinki ला उतरायचं नाही”, PUBG बॅननंतर नागपूर पोलिसांचं भन्नाट ट्विट
Just Now!
X