News Flash

Viral Video : …जेव्हा हरभजनने घेतला द ग्रेट खलीशी पंगा

नेटीझन्सनी दिला प्रचंड प्रतिसाद

Viral Video : …जेव्हा हरभजनने घेतला द ग्रेट खलीशी पंगा

टीम इंडियाचा स्टार फिरकी गोलंदाज हरभजन सिंह सध्या टीम इंडियातून बाहेर असला तरी सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे तो चर्चेत आहे. आधी आपल्या टॉक शोच्या माध्यमातून तर कधी त्याने केलेल्या ट्विटमुळे तो चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो एका गोष्टीसाठी चर्चेत आला आहे. त्याचे कारण आहे WWE तील माजी रेसलर दिलीप सिंह राणा उर्फ खली याच्यामुळे. हरभजनने खलीसोबतचे काही फोटो आणि व्हिडियो नुकतेच इन्स्टाग्रम अकाऊंटवर अपलोड केले आहेत. यामध्ये भज्जी खलीसह पंजा लढाई करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहे.

आता खली आणि हरभजन पंजा लढाई करत आहेत म्हणजे कोण जिंकणार याचा अंदाज आपल्याला एव्हाना आला असेल. मात्र या व्हिडियोमध्ये केवळ लढाई दाखविण्यात आली असून शेवट दाखविण्यात आला नाही. त्यामुळे व्हिडियो पाहणाऱ्यांच्या मनात कोण जिंकले हा प्रश्न कायम राहतो. इन्स्टाग्रामवर भज्जीने याचा बुमरॅंग टाकला असून त्याला खूप पसंती मिळत आहे. हा व्हिडियो आतापर्यंत ५४ हजार ४०० जणांनी पाहिला असून १३ हजार जणांनी तो लाईक केला आहे. तर ७३० जणांनी या व्हिडियोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी भज्जीची पत्नी गीता बसराही यावेळी उपस्थित होती आणि तिनेही खलीसोबतचा आपला फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. त्याच्यासोबत ती एकदम आनंदी दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2018 6:23 pm

Web Title: harbhajan singh and the great khali arm wrestling match video viral
Next Stories
1 यशस्वी होण्यासाठी धीरुभाई अंबानींची ‘ही’ १० वाक्ये तुम्हाला नक्कीच देतील प्रेरणा
2 कौतुकास्पद : पोलिसांनी दोन किलोमीटरची टेकडी रूग्णाला खांद्यावर घेऊन पार केली नी वाचवले प्राण
3 अॅपलच्या मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न वाचून तुम्हीही व्हाल हैराण  
Just Now!
X