News Flash

Video : लॅम्बॉर्गिनी चलाए जा तू…नवीन गाडीतून हार्दिक-कृणालचा मुंबईत फेरफटका

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

हार्दिक आणि कृणाल पांड्या हे भारतीय संघातले सर्वात स्टाईलीश खेळाडू म्हणून ओळखले जातात. इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धा पार पडल्यानंतर, विंडीज दौऱ्यासाठी निवड समितीने हार्दिक पांड्याला विश्रांती दिली होती. कृणाल पांड्याला विंडीज दौऱ्यात टी-२० संघात स्थान मिळालं होतं. या दौऱ्यात कृणालने अष्टपैलू कामगिरी करत आपली निवड सार्थ ठरवली.

पांड्या बंधूनी नुकतीच एक अलिशान लॅम्बॉर्गिनी गाडी विकत घेतली आहे. भगव्या रंगाच्या आपल्या या गाडीतून हार्दिक आणि कृणाल यांनी नुकताच मुंबईच्या रस्त्यांवर फेरफटका मारला. वांद्रे येथे एका कामासाठी आलेले असताना, हार्दिकच्या या अलिशान गाडीचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

Boyz on Road with their Sexiest Car

वेस्ट इंडिज दौरा आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात हार्दिक पांड्या भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 5:26 pm

Web Title: hardik pandya krunal pandya spotted in orange lamborghini in mumbai watch psd 91
Next Stories
1 कर्तव्यदक्ष : पूरग्रस्तांसाठी तहसिलदाराने डोक्‍यावर वाहून नेले तांदळाचे पोते
2 आईस्क्रीम खाण्यावरुन झाला वाद, प्रेयसीने प्रियकराचा केला खून
3 दरोडेखोरांशी दोन हात करणाऱ्या ‘त्या’ आजी-आजोबांचा शौर्य पुरस्काराने गौरव
Just Now!
X