02 March 2021

News Flash

National Duty to Father Duty : मुलगा अगस्त्यला बाटलीतून दूध पाजताना हार्दिकचा फोटो व्हायरल

हार्दिकच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत धडाकेबाज कामगिरी करुन मालिकावीराचा किताब पटकावणारा हार्दिक पांड्या आता आपल्या व्यस्त वेळापत्रकातून काहीसा मोकळा झाला आहे. सप्टेंबर महिन्यात आयपीएलचा तेरावा हंगाम खेळण्यासाठी युएईत दाखल झालेल्या हार्दिकने अंतिम सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाला जाऊन भारताकडून वन-डे आणि टी-२० मालिका खेळली. या ४ महिन्यांच्या धावपळीनंतर हार्दिकला आता आपला मुलगा अगस्त्यसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे.

मैदानात चौकार-षटकारांची आतिषबाजी करत गोलंदाजांच्या मनात धडकी भरवणाऱ्या हार्दिकने आपल्या मुलाला बाटलीमधून दूध पाजताना एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. From National Duty to Father Duty असं गोड कॅप्शन हार्दिकने या फोटोला दिलं आहे.

हार्दिकच्या या फोटोला नेटकऱ्यांनी चांगली पसंती दर्शवली आहे. टी-२० मालिकेतली बहारदार कामगिरी पाहिल्यानंतर हार्दिकला कसोटी संघातही स्थान मिळायला हवं अशी मागणी क्रिकेटचे चाहते आणि काही माजी खेळाडू करत होते. परंतू जोपर्यंत हार्दिक गोलंदाजी करायला लागत नाही तोपर्यंत त्याला कसोटीत स्थान मिळणं शक्य नसल्याचं विराटने स्पष्ट केलंय.

अवश्य वाचा – Video : कसं काय, सगळं बरं आहे ना? जेव्हा हार्दिक पांड्या मराठीतून बोलतो…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 10:54 pm

Web Title: hardik pandya shate cute picture while giving mil to his son agastya psd 91
Next Stories
1 ‘हिटमॅन’ फिटनेस टेस्ट पास पण संघातील सहभाग अजून निश्चीत नाही
2 ऋषभ पंतकडून कांगारुंची धुलाई, धडाकेबाज शतकासह केलं दणक्यात पुनरागमन
3 ऑस्ट्रेलियाचा असा करा पराभव; द्रविड-कुंबळेनं भारतीय संघाला दिला गुरुमंत्र
Just Now!
X