23 September 2020

News Flash

VIDEO: हर्षलची ‘हंबरून वासराले..’ कविता ऐकून सर्वांचेच डोळे पाणावले

सर्वच उपस्थित प्रेक्षकांचे डोळे पाणावले

सर्वांचेच डोळे पाणावले

कलर्स मराठीवरील “सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर” या कार्यक्रमाची सोशल मडियावर जोरदार चर्चा सुरु असते. या कार्यक्रमातील ६ ते १५ वयोगटातील बच्चेकंपनी आपल्या सुरांची जादू प्रेक्षकांसमोर तसेच परीक्षकांसमोर सादर करते. या कार्यक्रमाचे भाग प्रदर्शित झाल्यानंतर नंतर बरेच दिवस या लहान मुलांच्या गाण्यांचे तसेच मज्जा मस्तीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र सध्या या कार्यक्रमामध्ये सर्व मुलांचा मॉनेटर असणाऱ्या हर्षद नायबळने गायलेल्या एका भावनिक गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मागील आठवड्यामध्ये माऊली या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सिनेमाची संपूर्ण टीम या कार्यक्रमामध्ये आली होती. यामध्ये अभिनेता रितेश देशमुख, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधवसहीत अभिनेत्री संयमी खेर यांचा समावेश होता. जितेंद्रने काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात सादर केलेली ‘हंबरून वासराले चाटती जवा गाय’ ही कविता हर्षद अगदी छान तालासुरात सादर केली. हर्षदचा परफॉर्मन्स बघायला बऱ्याच दिवसांनी त्याची आई औरंगाबादवरून आली होती. मात्र अचानक गाता गाता हर्षदचे डोळे भरुन आले आणि गाण संपल्यावर त्याने मंचावरच रडण्यास सुरुवात केली. सूत्रसंचलन करणाऱ्या अभिनेत्री स्पृहा जोशीने हर्षदला मिठी मारुन उचलून घेतले. अवघ्या पाच वर्षाच्या हर्षदला अशापद्धतीने भावूक झालेले पाहून जितेंद्रही लगेच मंचावर येऊन त्याचे डोळे पुसू लागला. त्यानंतरही कार्यक्रमाचे परीक्षक शाल्मली खोलगडे, अवधूत गुप्ते आणि महेश काळे निस्तब्ध होऊन हे सारं पाहत होते. रितेशचे डोळेही या प्रसंगाने पाणावल्याचे कॅमेराने टिपले.

नेहमी मस्ती करणारा हर्षद अचानक रडू का लागला याबद्दल नंतर स्पृहाने स्पष्टिकरण दिले. हर्षद या कार्यक्रमासाठी आपल्या वडिलांबरोबर मुंबईत राहतो. तर हर्षदचा भाऊ वयाने अगदीच लहान असल्याने नाईलाजाने त्याच्या आईला औरंगाबादमध्ये रहावे लागते. त्यामुळे आईसमोरच आईबद्दलचेच गाणे गाताना हर्षद भावूक झाला. यानंतर जितेंद्रनेही स. ग. पाचपोळ यांची ही कविता आज खऱ्या अर्थाने सफल झाली. तिला आज हर्षदमुळे पुर्णत्व लाभल्याची भावना व्यक्त केली. तु्म्हीच पाहा हा व्हायरल होणारा व्हिडीओ

सगळ्या लहान मुलांचा मॉनेटर असणाऱ्या हर्षलचा हा व्हिडीओ पाहून अनेक उपस्थित प्रेक्षकांचे डोळे पाणावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 2:39 pm

Web Title: harshad naybals emotional performance on sur nava dhyas nava
Next Stories
1 विद्यार्थिनीला मदत करणाऱ्या श्वानाला मानद पदवी
2 आश्चर्यम..! निर्सगाच्या सानिध्यात जमिनीखाली दडलेले अनोखे गाव
3 Video : दोन हत्तींमध्ये जुंपते तेव्हा…
Just Now!
X