03 March 2021

News Flash

VIRAL VIDEO : मारहाण करण्या-या शिक्षकाचा विद्यार्थ्यांनी बनवला व्हिडिओ

गृहपाठ न करणे, कमी गुण मिळवणे यांसारख्या कारणावरून विद्यार्थ्यांना बेदम मारायचा

पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी करायला सुरूवात केली आहे.

विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करणे एका शिक्षकाच्या अंगाशी आले आहे. खाजगी शिकवण्या घेणारा हा शिक्षक वर्गातील मुला मुलींना बेदम मारायचा त्यामुळे काही मुलांनी मारहाणीचा व्हिडिओ बनवून तो टीव्ही चॅनलच्या हाती दिला तर सोशल मीडियावरही तो व्हायरल झाला आहे. हरियाणामधल्या एका खाजसी  शिकवणीतील हा व्हिडिओ आहे. Eponymous Coaching Centre असे या शिकवणीचे नाव आहे. नौदलातली निवृत्त अधिकारी  प्रदिप अरोडा ही शिकवणी चालवतात. १९९९ पासून त्यांची शिकवणी हरियाणात आहे आणि १०, १२वीत  शिकणारे अनेक विद्यार्थी येथे येतात. या विद्यार्थ्यांना गृहपाठ केला नाही किंवा परिक्षेत कमी गुण मिळवले या सारख्या कारणावरून प्रदिप अरोड बेदम मारहाण करायचा. उशिर झालेल्या विद्यार्थ्यांना देखील असाच मार पडायचा त्यामुळे त्याच्या वागण्याला कंटाळून काही मुलांनी त्याचा लपून व्हिडिओ बनवला आणि माध्यमांच्या ताब्यात दिला. मुलांनाच काय पण मुलींना देखील सगळ्यांसमोर बोलावून बेदम मारहाण केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. शिक्षकासमोर हतबल झालेल्या मुलींसमोर मुकाट्याने मार खाण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. टीव्हीवर ही बातमी आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी करायला सुरूवात केली आहे. पण एकाही पालकाने या शिक्षकाविरुद्ध पोलिसात तक्रार केली नाही. याउलट  पालकांनी  मुलांसोबत काही करण्याची सुट आपल्याला  दिली असल्याचे या शिक्षकाने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 3:42 pm

Web Title: haryana karnal teacher caught on camera assaulting students
Next Stories
1 आता प्रकाशामुळे कपडे होणार स्वच्छ
2 पत्नीने घर सोडल्यावर पतीचा शोले स्टाईल स्टंट
3 Video: ‘सुनो गौर से दुनिया वालों…’ गाण्यावर जवानांचा जल्लोष!
Just Now!
X