News Flash

शब्द पाळला! ‘शूज डॉक्टर’साठी आनंद महिंद्रांनी दिली अनोखी भेट

छोट्याशा व्यवसायाची त्यानं केलेली जाहिरात पाहून आनंद महिंद्रा इतके प्रभावित झाले होते की त्याच्यासाठी कमीत कमी जागेत एक लहान दुकान थाटून देण्याचा आपला विचारही त्यांनी

आर्थिक साहाय्यऐवजी छोटसं दुकान माझ्यासाठी तयार करता आलं तर उपकार होतील असं नरसीजी म्हणाले होते.

ट्विटरवर नेहमीच सक्रिय असणारे आनंद महिंद्रा नेहमीच आपल्या ‘व्हॉट्स अॅप वंडर बॉक्स’मधून काही भन्नाट कल्पना, व्हिडिओ शेअर करत असतात. महिनाभरापूर्वीच त्यांनी ट्विटरवर चपला शिवणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो शेअर केला होता. आपल्या छोट्याशा व्यवसायाची त्यानं केलेली जाहिरात पाहून आनंद महिंद्रा इतके प्रभावित झाले होते की त्याच्यासाठी कमीत कमी जागेत एक लहान दुकान थाटून देण्याचा आपला विचारही त्यांनी बोलून दाखवला होता. दिलेल्या शब्दाला जागलेल्या महिंद्रानी अखेर या व्यक्तीसाठी सुसज्ज असं मोबाईल दूकान तयार केलं आहे. हे मोबाईल दुकानं कुठेही सहज व्यावसायिक घेऊन जाऊ शकतो.

‘हे जखमी चप्पलाचं रुग्णालय असून येथे सकाळी ९ ते १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ‘जखमी’ चपलांवर जर्मन पद्धतीनं उपचार केले जातील.’ अशी हटके जाहिरातबाजी हरियाणामधल्या नरसीजींनी केली होती. ही जाहिरात महिंद्रांना खूपच आवडली होती. ही जाहिरात पाहून संबधित व्यक्ती हा ‘इंडियन इन्स्टिट्यूड ऑफ मनेजमेंट’मध्ये मार्केटिंग विषय शिकवत असावा असं कौतुक त्यांनी केलं होतं. याचवेळी त्याला अर्थिक मदत करण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली होती.

मात्र आर्थिक साहाय्यऐवजी छोटसं दुकान माझ्यासाठी तयार करता आलं तर उपकार होतील असं नरसीजी म्हणाले. त्यानंतर नरसीजींसाठी छोटंसं मोबाईल दुकान तयार करण्याचे आदेश त्यांनी आपल्या क्रिएटीव्ह टीमला केले. एवढ्याशा दुकानात चप्पलांपासून ते बसण्याचा बाक राहिल अशी सुविधा महिंद्रा यांच्या क्रिएटीव्ह टीमनं केली.

हे दुकान लांबून एका मोठ्या पेटीप्रमाणे भासेल अशा पद्धतीनं डिझाइन  केलं गेलं. लवकरच ते नरसीजींपर्यंत पोहोचवण्यात येईल असंही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 11:17 am

Web Title: haryana shoe doctor gets new kiosk from anand mahindra
Next Stories
1 इम्रान खान पाकिस्तानमधला केजरीवालांचा अवतार!
2 राष्ट्राध्यक्षांच्या समोरच केला ७६ आलिशान गाड्यांचा चुराडा
3 अद्वितीय… अवघ्या दोन हातांनी सांभाळलाय ‘गोल्डन ब्रिज’चा भार
Just Now!
X