चेहऱ्यावरचा तीळ महिलेला अधिक सुंदर बनवतो. तीळ असलेली महिला ही सुंदर दिसते असं म्हणतात. पण हेच तीळ सर्वांगावर असले तर ती महिला सुंदर नसून, कुरूप ठरते ही लोकांची मानसिकता अनेकदा मनाला बोचणारी ठरते. असंच काहीसं झालंय मेलेशियाची मॉडेल इव्हिटासोबत. वय वर्षे फक्त २० असलेली इव्हिटा आज मिस युनिव्हर्स स्पर्धेची तगडी दावेदार मानली जात आहे. पण या स्थानापर्यंत पोहचणं तिच्यासाठी म्हणावं तितकं सोप नक्कीच नव्हतं.

वाचा : जाणून घ्या अमिताभ बच्चन यांच्या ट्विटच्या सुरूवातीला असणाऱ्या आकड्यांचा अर्थ

Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
lokmanas
लोकमानस: मोदींचे ‘गेमिंग’बद्दलचे मत धक्कादायक
regularly eating papaya on an empty stomach
Papaya Benefits : सकाळी उपाशी पोटी खा पपई , ॲसिडिटीचा त्रास होईल दूर; जाणून घ्या, आहारतज्ज्ञ काय सांगतात..
Why stress test of mutual fund is important
तुमच्या म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट काय सांगते? म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट महत्त्वाची का?

आपल्याकडे सौंदर्यांची व्याख्या ठरलेली आहे. गोरा रंग, सडपातळ शरीर, नाकी डोळे आखीव रेखीव, लांब केस ही जी काही सौंदर्यांची ठरलेली व्याख्या आहे ती किती चुकीचे आहे हे आपल्या कधी कधी लक्षातही येत नाही. जगात प्रत्येक व्यक्ती ही सुंदरच असते, पण आपण मात्र त्या व्यक्तीला सुंदर मानायलाच तयार नसतो. हा अनुभव इव्हिटाला पावलोपावली आला. मलेशियातल्या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतल्याने आता संपूर्ण जगाचं लक्ष तिच्याकडे आकर्षित झालंय. तिच्या सर्वांगावर काळे तीळ आहेत आणि यामुळे ती सर्वापेक्षाही वेगळी दिसते. तिच्या या रुपामुळे पावलोपावली तिला हिणवले गेले. एवढंच नाही तर लहानपणापासून तिच्या दिसण्यामुळे राक्षसीणीचा ठपका तिच्यावर बसला. तिच्याशी मैत्री करणं अनेकांनी नाकारलं.

वाचा : ‘LG’चा फुलफॉर्म माहितीये?

खरंतर सर्जरी करून काही प्रमाणत तिला हे डाग घालवता आले असते पण तिने मात्र हेच डाग अभिमानाने आपल्या शरीरावर मिरवायचे ठरवले. सौदर्याच्या ज्या काही लोकांच्या मनात खुळचट कल्पना आहेत. या तिला बदलायच्या आहेत. आपण लोकांसाठी आपलं रुप का बदलावं त्यापेक्षा लोकांनी मी जशी आहे तसं मला स्वीकारावं या मताची ती आहे आणि याच भूमिकेमुळे ती आपलं वेगळं स्थान निर्माण करते आहे आणि मिस युनिव्हर्सच्या किताबाची ती प्रबळ दावेदार मानली जातेय.

https://www.instagram.com/p/BVjCweJACVY/