तुरटी फक्त दूषित पाणी स्वच्छ करत नाही. तर आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. तुरटी ही मॅग्नेशियिम सल्फेट आणि केमिकल कम्पाउंडने बनलेली असते. मॅग्नेशियम ह्यूमन सेलचा एक महत्त्वपुर्ण भाग आहे. ही शरीरात 300 पेक्षा जास्त एंजाइम्सला रेग्यूलेट करते आणि आपल्याला निरोगी ठेवण्यात मदत करते. तुरटी लाल आणि पांढर्‍या रंगाची असते. जास्त करून पांढर्‍या तुरटीचा प्रयोग जास्त केला जातो.

जाणून घेऊयात तुरटीचे फायदे….

  • तुरटीचा उपयोग करून दूषित पाण्याने होणार्‍या रोगांपासून बचाव केला जाऊ शकतो. तसे पाणी उकळून, थंड करून पिण्याने सुद्धा रोगांपासून बचाव होऊ शकतो, परंतु तुरटीचा उपयोग एक स्वस्त, सोपा आणि त्वरित परिणाम देणारा उपाय आहे.
  • सतत घाम येत असल्यास अंघोळीच्या पाण्यात तुरटी घालून त्या पाण्याने अंघोळ केल्यानं घाम येणं कमी होऊ शकते.
  • जखमेला तुरटीने स्वच्छ धुवून घ्यावं. त्यानंतर जखमेवर तुरटीचे चूर्ण लावल्याणं रक्त थांबेल.
  • तुरटी आणि काळ्या मिर्‍याची पूड दातांवर लावल्याने दाताचे दुखणे थांबण्यास मदत मिळते.
  • शेविंग केल्यानंतर चेहर्‍यावर तुरटी लावल्याने चेहरा मऊ होतो.
  • अर्धा ग्रॅम तुरटीच्या पुडाला मधात मिसळून चाटल्याने दमा आणि खोकल्यात आराम मिळतो.
  • भाजलेली तुरटी 1-1 ग्रॅम सकाळ संध्याकाळी पाण्यासोबत घेतल्याने रक्ताच्या उलट्या येणे बंद होतात.
  • एक लीटर पाण्यात 10 ग्रॅम तुरटीचे चूर्ण घोळून घ्या. या पाण्याने रोज डोकं धुतल्याने डोक्यातील ऊआ मरतात.