News Flash

Viral Video : पाचव्या मजल्यावरून खाली पडला दोन वर्षाचा मुलगा, त्यानंतर …

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

श्वास रोखून ठेवायला लावणारा चीनमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. द सनने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडीओ चीनच्या जिआंग्सु प्रांतताच्या हुवाई शहरातील आहे. पाचव्या मजल्याहून म्हणजेच जवळपास शंभर फूटावरून एक मुलगा खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली. मुलगा इमारतीहून खाली पडत होता त्याचवेळी शेजारी असलेल्या व्यक्तीने चिमुरड्याला अलगद झेलले. हा मुलगा अवघ्या दोन वर्षाचा आहे.

बेडरुममध्ये या मुलानं स्वत:ला कोंडून घेतलं होतं. त्यानंतर खेळताना स्टूलवरून खिडकीत आला. त्यानं खिडीबाहेर असलेल्या स्लोपला घट्ट पकडून धरलं आणि वाचवण्यासाठी ओरडू लागला. त्यानंतर खिडकीतून हात घसरुन खाली पडला. त्याच दरम्यान खाली उभ्या असलेल्या तरुणानं या मुलाचा जीव वाचवला. हा तरुण देवदूतच बननून आला आणि त्यानं चिमुकल्याला वाचवलं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 1:18 pm

Web Title: heart stopping moment toddler caught neighbour china nck 90
Next Stories
1 समु्द्रात होणारे भूकंप, त्सुनामीचा अंदाज केबलच्या मदतीने व्यक्त करता येईल?; गुगलचे अधिकारी म्हणतात…
2 कारण त्यांच्याकडे पर्याय नव्हता… विद्यार्थी शिव्या देऊ लागल्यानंतर त्यांना काय करावं कळेना, अखेर….
3 Scary! नदीमधून जाताना मगरीने केला हल्ला, कॅमेरात कैद झाला थरार
Just Now!
X