मानवाप्रमाणे इतर प्राण्यांना भावना मुक्तपणे व्यक्त करता येत नाही असं म्हणतात. मात्र याला एक अपवाद आहे ते म्हणजे हत्ती. हत्ती मानवाप्रमाणेच आपल्या भावना व्यक्त करतात असं संशोधकांच म्हणणं आहे. याचचं जातं उदाहरण एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये हत्तींचा एक कळप मेलेल्या हत्तीच्या पिल्लाला घेऊन जाताना दिसत आहे. कळपामधील हत्ती या मेलेल्या पिल्लाला सोडण्यास तयार नसल्याचे त्यांच्या कृतीमधून दिसत आहे.

भारतीय वनखात्यामध्ये काम करणाऱ्या प्रवीण कासवान या अधिकाऱ्याने हत्तीच्या कळपाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. यामध्ये कळपामधील हत्ती या पिल्लाच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह घेऊन जाताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये प्रवीण लिहितात, ‘हा व्हिडिओ पाहून तुम्ही हदरुन जाल. हत्तींचा कळप त्यांच्यातील एका लहान हत्तीचा मृतदेह घेऊन जात आहे. हत्तीच्या या कुटुंबाला मेलेल्या सदस्याला सोडावंसच वाटत नाहीय.’

रस्त्यावरुन शूट केलेल्या या व्हिडिओमध्ये रस्त्याच्याकडेच्या झाडांमधून हत्तीचा कळप मेलेल्या लहान हत्तीचा मृतदेह सोंडेत घेऊन बाहेर येताना दिसतो. या व्हिडिओमध्ये दूरवरुन काही पर्यटक हा सर्व प्रकार पाहत असल्याचे व्हिडिओत दिसते. हे हत्ती जंगलातून बाहेर रस्त्यावर येऊन सोंडेतील छोट्या हत्तीचा मृतदेह रस्त्यावर ठेऊन काही पावले मागे जाऊन थोडावेळ शांत उभे राहतात. त्यानंतर पुन्हा मृतदेह घेऊन जंगलात निघून जातात.

पुढील ट्विटमध्ये प्रवीण यांनी पुरातन लेखांमध्ये हत्तीच्या अंत्यसंस्काराबद्दलची माहिती सापडते. मात्र अशाप्रकारची घटना आपण प्रत्यक्षात कधीही पाहिली नव्हती असेही म्हटले आहे.

अवघ्या काही तासांमध्ये हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला. दोन लाखांहून अधिक व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले असून सहा हजार ८०० हून अधिक जणांनी तो रिट्विट केला आहे. सातशेहून अधिक जणांनी या व्हिडिओवर आपले मत मांडले. पाहुयात काय म्हणणे आहे नेटकऱ्यांचे या व्हिडिओबद्दल…

आपण प्राण्यांकडून शिकायला हवे

पहिल्यांदाच असा व्हिडिओ पाहतेय

त्या आईसाठी हृद्य हळहळले

प्राणी आपल्यापेक्षा बरे

काय बोलायच कळतच नाही

..आणि आपल्याकडे दोन वर्षाच्या मुलीची हत्या होते

ते आपल्यापेक्षा जास्त शिस्तीचे

एकता ,प्रेम अन् बरचं काही

ते आपल्यासारखे नाहीत

या सर्व कमेंटसवरुन मानवानेही या प्राण्यांकडून बंधुभाव, एकदा आणि प्रेमाचे धडे घ्यायला हवे असंच नेटकऱ्यांचे मत असल्याचे दिसते.