News Flash

टबभर चिल्लर देऊन आयफोन विकत घेण्यामागचं कारण विचार करण्यासारखं…

चिल्लरनं भरलेला मोठा टब घेऊन तो दुकानात गेला आणि मोबाइल विकत घेतला अशी बातमी काही दिवसांपूर्वी वाऱ्यासारखी पसरली.

चिल्लर देऊन आयफोन विकत घेणारा हा तरुण खूपच चर्चेत आला.

रशियातल्या एका व्यक्तीनं बाथटबभरून चिल्लर देऊन चक्क आयफोन विकत घेतल्याची बातमी काही दिवसांपूर्वी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली. अनेकांना हा प्रकार काहीसा वेगळा आणि हास्यास्पद वाटला. एवढी चिल्लर घेऊन एखादा व्यक्ती दुकानात गेलाच कसा असा प्रश्न अनेकांना पडला. त्याच्याजवळ असलेला मोठा टब आणि त्यात असलेली नाणी पाहून अनेकांचे डोळे विस्फारले. या कृतीमुळे रशियातला तरूण चर्चेचा विषय बनला. मात्र चिल्लर देऊन फोन खरेदी करण्यामागचं या तरुणाचं कारण खूपच वेगळं आणि विचार करण्यासारखं होतं.

हा तरुण रशियातला प्रँकस्टार आहे. सुट्ट्यापैशांकडे पाहण्याचा इथल्या लोकांचा दृष्टीकोन खूपच चुकीचा आहे. अनेक दुकानदार सुट्टे पैसे स्वीकारत नाही. जो ग्राहक सुट्टे पैसे देतो त्याला सुविधा देणंही दुकानदार नाकारतात. हाच दृष्टीकोन आम्हाला बदलायचा होता म्हणून आम्ही नाणी देऊन मोबाईल विकत घेतला असं या प्रँकस्टारनं सांगितलं. आयफोनसाठीची जवळपास ८० हजारांहून अधिकची रक्कम त्यानं या स्वरुपात आणली होती. ही चिल्लर मोजण्यासाठी कर्मचाऱ्यांना दोन तास लागले. पण अखेर या प्रँकस्टारनं आयफोन विकत घेऊन दाखवलाच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2018 4:32 pm

Web Title: heres why they buy an iphone with bathtub full of coins
Next Stories
1 चर्चा तर होणारच! दीप-वीरच्या लग्नाचे भन्नाट मीम्स व्हायरल
2 बलात्काराच्या आरोपीची सुटका केल्याने आयर्लंडमध्ये आक्रोश, अंतर्वस्त्र घेऊन संसदेत पोहोचली महिला खासदार
3 ‘मॅगी’ची आकर्षक ऑफर, रिकामी पाकिटं देऊन भरलेलं पाकिट घ्या
Just Now!
X