18 September 2020

News Flash

घरट्यासाठी कायपण..

तामिळनाडूच्या जंगलातील गरुड- कावळ्याच्या लढाईचा फोटो व्हायरल

( छाया सौजन्य : Greaves Henriksen )

कॅमेरा पण कमालीची वस्तू आहे बुवा. कधी आपल्या कॅमेरात काय टिपून घेईल सांगता येत नाही. तामिळनाडूतला असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एरव्ही गरुडासमोर तसा दुबळा असलेला कावळा चक्क आपल्या घरटे वाचवण्यासाठी या ताकदवान पक्ष्याशी लढलाय. क्विचत दिसणारे हे चित्र सध्या सोशल मीडियार व्हायरल होत आहे.

viral video : जंगलात सिंह पाहायला आलेल्या पर्यटकांना असे दिले राजाने दर्शन

तामिळनाडूतल्या एका जंगलात छायाचित्रकार Greaves Henriksen यांनी हा फोटो आपल्या कॅमेरात कैद केला आहे. भटकंती करत असताना  त्यांना एक अजबच चित्र दिसले. एक कावळा चक्क गरुड पक्ष्याला आपल्या चोचीने बोचत होता. त्याच झालं असं की गरुड ज्या फांदीवर बसला होता त्यापासून काही दूर अंतरावर कावळ्याचे घरटे होते. गरुड पक्षी आपल्या घरट्यावर हल्ला करुन पिल्लांना खाईल या भितीने या कावळ्याने गरुडावर हल्ला करायला सुरूवात केली. शेवटी कावळ्या पुढे या गरुडाने हार मानत तिथून पळ काढला.

VIDEO : आपल्या पिल्लासाठी शेवटपर्यंत शिका-यांशी लढली मादा डॉल्फिन

निर्सगाचा एक नियम आहे, बळी तो कान पिळी. पण जेव्हा प्रश्न पिल्लांचा अन् घरट्याचा येतो तेव्हा या दुबळ्या पंखातही बळ येते. मग जीव गेला तरी बेहत्तर पण घरटं वाचावायचे एवढंच त्यांना ठावूक असतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 10:28 am

Web Title: hilarious photographs of crow and eagle fighting goes viral on social media
Next Stories
1 viral : कारण जगात आजही चांगली माणसं आहेत…
2 viral : चीनच्या अनेक शाळांत दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी सक्तीची
3 VIDEO : काम संपलं, आता धम्माल!
Just Now!
X