हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यातील तिर्थन घाटीमध्ये गुरुवारी रस्त्यावर अचानक बिबट्या आला. बिबट्याला बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. बिबट्या हिंसक प्राणी आहे, पण कुल्लूमध्ये रस्त्यावर आलेल्या या बिबट्याने कोणावरही हल्ला केला नाही. उलट तो लोकांसोबत चक्क खेळताना आणि मजामस्ती करताना दिसला.

हा बिबट्या लोकांमध्ये आरामात फेरफटका मारत होता. लोकंही न घाबरता त्याच्याशी मस्ती करत होते. काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओही बनवला असून हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. दुपारी १२ वाजेच्या सुमारास वन विभागाच्या टीमने बिबट्याला पकडून पुन्हा जंगलात सोडलं. सकाळी जवळपास सात वाजण्याच्या सुमारास लोकांनी रस्त्यावर अचानक आलेल्या या बिबट्याला पाहिलं. त्यावेळी अनेकजण गाडीबाहेर आले आणि त्यांनी बिबट्यासाठी खाण्यापिण्याचे पदार्थ फेकायला सुरूवात केली. हा बिबट्या रस्त्यावर उभ्या एका व्यक्तीजवळ जाऊन त्याच्या अंगा खांद्यावर खेळताना दिसत आहे. हा बिबट्या म्हणजे एक वर्षाचं पिल्लू असल्याची माहिती मिळाली आहे. कुल्लू खोऱ्यात सध्या उंचावरील परिसरात बर्फवृष्टी होत आहे. गारठवणाऱ्या थंडीपासून बचावासाठी जंगली प्राणी अनेकदा रहिवासी परिसरात येत असतात. शिवाय जिथे हा बिबट्या दिसला तिथून द ग्रेट हिमायलन नेशनल पार्क जवळच आहे. तिथूनच हा बिबट्या आला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. बघा व्हिडिओ :-

आणखी वाचा- मालकिणीचा आदेश येताच म्हशीने फिल्मी गाण्यावर केला जबरदस्त डान्स, बघा Viral Video

लोकांवर हल्ला करण्याऐवजी त्यांच्यासोबत खेळणाऱ्या या बिबट्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.