News Flash

Hindi Divas: ‘या’ महाविद्यालयाने हिंदीत सुरु केलेलं इंजिनिअरिंग, नंतर केलं बंद; जाणून घ्या कारण

अभियांत्रिकी अभ्यास फक्त हिंदीत सुरू करणारे हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले. पण हा उपक्रम यशस्वी होऊ शकला नाही.

college started Engineering in Hindi
अभियांत्रिकी अभ्यास फक्त हिंदीत सुरू करणारे महाविद्यालय (फाईल फोटो)

परदेशात मातृभाषेत व्यावसायिक शिक्षणाच्या अध्यापनामुळे प्रेरित होऊन भारतातही हिंदी माध्यमातील अभियांत्रिकी अभ्यास सुरू झाला, पण हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. भोपाळस्थित अटल बिहारी वाजपेयी हिंदी विद्यापीठाने २०१६ मध्ये हा उपक्रम सुरू केला. अभियांत्रिकी अभ्यास फक्त हिंदीत सुरू करणारे हे देशातील पहिले विद्यापीठ आहे.

कमी अर्ज आले

प्रेरित होऊन सुरु केलेला हा उपक्रम यशस्वी होऊ शकला नाही आणि अनेक समस्यांमुळे अभ्यासक्रम बंद करावा लागला. त्यानंतर या विद्यार्थ्यांना इतर संस्थांमध्ये सामावून घेण्यात आले. सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलमध्ये एकूण ९० सीटसाठी अर्ज मागवण्यात आले होते, परंतु केवळ १२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. कमी विद्यार्थी संख्या वगळता, कोर्सला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मान्यताही नव्हती.एक असाही विश्वास होता की हिंदीमध्ये कोर्स केल्यास रोजगाराच्या संधी मर्यादितच राहू शकतात.

रोजगाराबद्दल कुलगुरू म्हणाले..

या प्रकरणात, तत्कालीन कुलगुरू म्हणाले होते की, विद्यापीठाचे उद्दिष्ट केवळ रोजगार सुनिश्चित करणे नाही, विद्यार्थ्यांना नोकरी करण्याऐवजी त्यांनी नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात अशी आमची इच्छा आहे.

अनुवादकांची मदत

अभियांत्रिकी सामग्री तयार करण्यासाठी विद्यापीठाने भाषांतरकारांची नेमणूक केली, परंतु त्यांनी ज्या इंग्रजी शब्दांचा वापर करणे अपेक्षित होते ते वापरलेच नाहीत.अशा परिस्थितीत विद्यापीठाने अनुवादकांची सेवाही घेणे बंद केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2021 12:22 pm

Web Title: hindi divas this college started engineering in hindi then closed know the reason ttg 97
Next Stories
1 यांचं भलतच! चक्क म्हशीच्या पाठीवर बसून उमेदवार गेला अर्ज भरायला…
2 अमेरिकन डॉलर, अगणित संपत्ती, सोन्याची बिस्किटं आणि दागदागिने! ‘या’ मंदिरात आहे कोट्यवधींचा खजिना!
3 मुलुंड: भावाचा जीव वाचवण्यासाठी बहिणीनं स्वत:च केलं यकृतदान! डॉक्टरही म्हणाले, “परदेशात राहूनही नातं…!”
Just Now!
X