18 February 2019

News Flash

Holi 2017 : गुगलवरही रंग बरसे….

रंगपंचमीसाठी गुगलने डुडल बनवले आहे

गुगलकडून होळीच्या शुभेच्छा

‘रंग बरसे भिगे चुनरवाली रंग बरसे’, ‘होली खेले रघुविरा’, ‘खेलेंगे हम होली’ होळीच्या एकापेक्षा एक गाण्यांवर ताल धरत रंगाची उधळण जिथे तिथे सुरू झाली आहे, नववर्षांतला हा दुसरा मोठा सण. ‘बुरा ना मानो होली है’ म्हणत एकमेकांच्या अंगावर रंगाची उधळण करायची आणि काही वेळासाठी का होईना सारी दु:ख विसरून जायची असा हा रंगपंचमीचा सण.. होळी पेटवल्यानंतर दुस-या दिवशी रंगपंचमी खेळली जाते.
एकीकडे भारतात मोठ्या उत्साहात खेळला जाणा-या या रंगाच्या सणाकडे गुगलचे लक्ष वेधले गेले नाही तर नवलच. म्हणूनच आज गुगलवर देखील रंगाची उधळण पाहायला मिळत आहे. सलग दोन दिवस होळी आणि रंगपंचमीसाठी गुगलने डुडल बनवले आहे. काही छोट्या मुलांचे टोळकं येतं आणि एकमेकांवर रंगांची उधळण करतं असे हे डुडल आहे. भारत, नेपाळ यासारख्या देशांत खेळल्या जाणा-या होळी आणि रंगपंचमी सणांचे महत्त्वही गुगलने यातून समजावून सांगितले आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे विविध जातीचे धर्माचे लोक एकोप्याने राहतात. होळीच्या दिवशी सारे दु:ख विसरून सगळे एकत्र येतात. उत्तरेकडे तर मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो.
गुगलनेही डुडलमार्फत सा-या भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. चला तर मग या रंगाच्या उत्सवात आपणही सहभागी होऊ या !

आतापर्यंत होळीसाठी गुगलने बनवलेले डुडल आतापर्यंत होळीसाठी गुगलने बनवलेले डुडल

First Published on March 13, 2017 9:29 am

Web Title: holi 2017 google doodle celebrates holi