News Flash

तिची टिकटॉकवरील कमाई पाहून थक्क व्हाल, लोकप्रियता वाढल्याने नेमावे लागले बॉडीगार्ड

वय वर्ष २३, तिच्या आईने मुलीची कमाई पाहून नोकरीचा राजीनामा दिला

होली हॉर्नी

सोशल मिडिया म्हणजे टाइमपास असा अनेकांचा समज आहे. मात्र त्याच वेळी सोशल मिडियावरुन रातोरात लोकप्रिय होणाऱ्या आणि श्रीमंत होणाऱ्यांची संख्याही बरीच आहे. एका रात्रीत लोकप्रिय झालेल्या अनेकांची उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. त्याचप्रमाणे मोठ्याप्रमाणात ट्रोल होणाऱ्या सेलिब्रिटीजची यादीही मोठी आहे. काळानरुप सोशल मिडीया प्लॅटफॉर्म वारंवार बदलत राहतात. सध्या जगभरामध्ये चर्चा आहे ती टिकटॉकची. टिकटॉक सर्वात जास्त डाऊनलोड करणाऱ्यांच्या यादीमध्ये भारत तर पहिल्या स्थानी आहे. आज अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये टिकटॉक पाहणाऱ्या आणि त्यावर व्हिडिओ शूट करणाऱ्या युझर्सची संख्या लाखोंमध्ये आहे. मात्र याच टिकटॉकमुळे ब्रिटनमधील एक तरुणी चक्क अब्जाधीश झाली आहे.

ब्रिटनमधील होली हॉर्नी असं या २३ वर्षीय मुलीचं नाव आहे. टिकटॉकवर तिचे होली एच नावाने अकाऊंट आहे. होलीच मुलीचे चक्क एक कोटी ६० लाख फॉलोअर्स आहेत. ती आजच्या घडीला जगातील सर्वात मोठ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे.

आपल्या व्हिडिओमुळे ही मुलगी इतकी लोकप्रिय झाली आहे की तिच्या संपत्तीमध्येही मोठी वाढ झाली आहे. तिने या कमाईमध्ये घर आणि संपत्ती विकत घेतल्याचेही वृत्त आहे. संपत्तीबरोबरच तिची लोकप्रियता एवढी वाढली आहे की तिला सुरक्षारक्षक नेमावे लागले आहेत. तसेच मुलीची प्रसिद्धी आणि प्रगती पाहून तिची आई जोडी हिने नोकरीचा राजीनामा दिला आहे.

होली ही सध्या ब्रिटनमधील मोठी सेलिब्रेटी आहे. होली दिसायला खूप सुंदर आहे. आकर्षक चेहरा असणाऱ्या होलीला रोज तिचे लाखो फॉलोअर्स तिच्या प्रोफाइलला भेट देतात. तिच्या व्हिडिओला लाखोंमध्ये हिट्स असतात. टिकटॉकवर जास्तीत जास्त १५ सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट करता येतो. होलीचा असाच एक व्हिडिओ नेटकऱ्यांनी चक्क ७ कोटी ७२ हजार वेळा पाहिला होता. होली अनेकदा गाण्यांचे आणि टीव्हीवरील कार्यक्रमांमधील डायलॉग बोलतानाच लीप सिक्रो व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरुन पोस्ट करत असते.

होलीने पहिल्यांदा २०१५ साली व्हीन या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ अपलोड केला होता. मात्र २०१७ साली व्हीन बंद झाल्यानंतर तिने टिकटॉकवर अकाऊंट सुरु केले आणि तिथे ती व्हिडिओ पोस्ट करु लागली. लंडनजवळ असणाऱ्या सनसेक्समध्ये होली तिचे आई-वडील आणि दोन भावंडांबरोबर राहते.

एका अंदाजानुसार होली टिकटॉकवरुन साडेतीन कोटी ते १४ कोटी १६ लाखांदरम्यान कमाई करते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 3:06 pm

Web Title: holly horne a tiktok star who takes home six figure salary scsg 91
Next Stories
1 Jio ने हटवला ₹49 चा प्लॅन, आता ₹75 पासून सुरूवात
2 ऐकावं ते नवलंच : या माणसाकडे आहे ‘किलर गॅस’; वास घेताच होतो डासांचा खात्मा
3 उंदीर मारण्यासाठी पश्चिम रेल्वेने तीन वर्षात खर्च केले दीड कोटी रुपये!
Just Now!
X