ब्राझीलमध्ये सध्या एका बेघर व्यक्तीची तुफान चर्चा आहे. मागील दहा वर्षांपासून बेघर म्हणून राहणाऱ्या या व्यक्तीचे फोटो सध्या ब्राझीलबरोबरच जगभरामध्ये व्हायरल झालेत. एका हेअरकटने या व्यक्तीचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं आहे. इंटरनेटवर सध्या त्याच्या या आधीच्या आणि आताच्या आयुष्याची जोरदार चर्चा सुरु असून त्याच्या आयुष्याला मिळालेल्या या कलाटणीची गोष्ट व्हायरल होत आहे. आपणही नक्की काय आहे हे प्रकरण त्याबद्दल जाणून घेऊयात.

नक्की वाचा >> शेतकरी आंदोलन : नाद खुळा… ६२ वर्षांच्या आजीबाई २३० किमी गाडी चालवत सिंघू बॉर्डरवर पोहचल्या

ब्राझीलमध्ये राहणाऱ्या जोआओ कोएल्हो गुइमारो या व्यक्तीची ही कहाणी आहे. जोआओ मागील एका दशकापासून बेघरांप्रमाणे राहत होता. तो रस्त्यावर भीक मागून आयुष्य जगत होता. त्याच्याकडे ना राहण्यासाठी घर होतं ना त्याचे कोणी नातेवाईक होते. मात्र मध्यंतरी एक व्यक्ती जोआओला भेटली आणि त्याने त्याचे आयुष्यच बदललं. मेन्स फॅशन स्टोअर आणि स्वत:चं सलून असणाऱ्या एलेसेंड्रो लोबोने जोआओची अवस्थापासून त्याला मदत केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by P A D O O (@padoooficial)

हेअर कटने बदललं आयुष्य

जोआओला एलेसेंड्रो हे पहिल्यादा आपल्या दुकानामध्ये हेअरकटसाठी घेऊन गेले तेव्हा त्यांनी जोआओला भूक लागली असल्यास काही खायला मागवू का असं विचारलं. त्यावेळी जोआओने खाण्यासाठी नकार दिला. जोआओने एलेसेंड्रो यांच्याकडे दाढी करण्यासाठी रेजर देण्याची मागणी केली. त्यांची मागणी ऐकून एलेसेंड्रो यांनी जोआओला पूर्णपणे नवा लूक देण्याचा निर्णय घेतला.

नक्की वाचा >> विठ्ठला मायबापा… डोळ्यात पाणी आणणारा हा अत्यंत सुंदर फोटो होतोय व्हायरल

इतरांकडून मोठी रक्कम आकारणाऱ्या एलेसेंड्रो यांनी जोआओला मोफत हेअरकट देण्याचा निर्णय घेतला. जोआओने दिलेली ऑफर मान्य करत एलेसेंड्रो यांच्या सलूनमध्ये कर्मचाऱ्यांकडून हेअरकट आणि दाढी करुन घेण्याचा निर्णय घेतला. जोआओ यांचा मेकओव्हर केल्यानंतर एलेसेंड्रो यांनी त्याला तीन शर्ट, एक पॅण्ट, जॅकेट आणि बूट भेट म्हणून दिले. जोआओ त्याच्या मेकओव्हरनंतर खूपच स्मार्ट आणि वेगळा दिसत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by P A D O O (@padoooficial)

कुटुंबाला वाटलेलं जोआओचा मृत्यू झाला

जोआओच्या नव्या लूकचे फोटो एलेसेंड्रो यांनी आपल्या इन्स्ताग्रामवर पोस्ट केले. जोआओ यांचे हे फोटो व्हायलर झाले. त्यांचे हे फोटो थेट त्यांच्या नातेवाईकांपर्यंतही पोहचले. त्यांनी हे फोटो पाहताच जोआओ यांना ओळखलं. जोआओ हे बेपत्ता झाल्यापासून म्हणजेच दहा वर्षांपूर्वीच मरण पावल्याचं कुटुंबाला वाटलं होतं. दहा वर्षानंतर या फोटोंमुळे जोआओ त्यांच्या आईला आणि बहिणीला भेटले. जोआओचे कुंटबीय हे ब्राझिलिया डीएफ येथे राहतात. ते जोआओला भेटण्यासाठी १७ डिसेंबर रोजी गोयनिया शहरामध्ये गेले.

 

View this post on Instagram

 

A post shared by P A D O O (@padoooficial)

…पण घरी जाण्यास दिला नकार

दुकानाचे मालक असणाऱ्या एलेसेंड्रो यांनी जोआओकडे त्यांच्या घरासंदर्भात किंवा त्याच्या नातेवाईकांसंदर्भात चौकशी केली नाही. एलेसेंड्रोने दिलेल्या माहितीनुसार जोआओच्या बहिणीने त्याला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र जोआओने आपल्या बहिणीसोबत जाण्यास नकार दिला. मला रस्त्यांवर अधिक छान वाटतं आणि इथे जास्त मोकळेपणा आहे असं सांगत जोआओने घरी जाण्यास नकार दिलाय.

नक्की  पाहा  >> Video : शहरावर बकऱ्या-मेंढ्यांच्या कळपाने केला हल्ला; नागरिकांना पळवून पळवून दमवलं