News Flash

बूट सुकवण्यासाठी विमानात असं काही केलं की… ; आठ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय हा Video

सध्या सोशल नेटवर्किंगवर या व्हिडीओची चर्चा आहे

सोशल मीडियावर आतापर्यंत तुम्ही विमानातील अनेक व्हिडीओ पाहिले असतील. यामध्ये प्रवाशांच्या विचित्र वागणुकीपासून ते विमानातील विचित्र किस्स्यांचे चित्रिकरण करण्यात येतं. असे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओत एक प्रवासी आपला ओला झालेला बूट सुकवताना दिसत आहे.

ओले झालेले बूट सुकववण्यासाठी या प्रवाशाने एक भन्नाट कल्पना शोधून काढल्याचे व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडिओतील प्रवासी विमानातील प्रवासी एसी व्हेंटजवळ आपला बूट लटकवताना दिसत आहे. एसीच्या व्हेंटमधून बाहेर पडणाऱ्या हवेच्या मदतीने बूट सुकवण्याचा प्रयत्न ही व्यक्ती करत आहे. हा व्हिडीओ इन्स्ताग्रामवर ‘पॅसेंजर शेमिंग’ म्हणजेच लज्जास्पद वर्तवणूक केल्याची टीका करत शेअर केला जात आहे. या व्हिडीओत बूट सुकवण्याच्या नादात हा प्रवासी करत असलेल्या वेगवेगळ्या कसरती दिसत आहेत. या व्हिडिओत एक व्यक्ती आपल्या सीटवर बसलेली आहे. या व्यक्तीच्या समोर बसलेली व्यक्ती आपला एक बूट हातात एसी व्हेंटजवळ पकडून बसलेला दिसतोय. ही व्यक्ती आपला बूट सुकवण्याचा प्रयत्न करतोय. “तर या व्यक्तीला स्वत:ची अशी काही जागृक्ताच नाहीय. हे लवकरात लवकर थांबवलं पाहिजे,” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Passenger Shaming (@passengershaming)

आठ लाखांहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. या व्हिडीओवर शेकडोच्या संख्येने कमेंट्स लोकांनी केल्या आहेत. अनेकांनी या व्यक्तीची टर उडवली असून त्याच्यावर टीका केलीय. एका इन्स्ताग्राम युझरने, “कोणीही माझ्या शेजारी बसून असं करु नये. असं कोणी केल्यास मी तिथेच त्या व्यक्तीचा समाचार घेईल,” अशी कमेंट केलीय. तर दुसऱ्या युझरने, “आपला सुगंध विमानभर पसरवण्यासाठी ही चांगली कल्पना आहे,” अशी तर अन्य एकाने “हा काय वेडेपणा आहे?” असा प्रश्न कमेंटमध्ये विचारला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2020 10:22 am

Web Title: horrible passenger uses airplane vent to dry shoes scsg 91
Next Stories
1 झुमका गिरा रे ! मुंबई एअरपोर्टवर हरवले जुही चावलाचे हिऱ्याचे कानातले, शोधणाऱ्याला मिळणार बक्षीस
2 खरा सुपरहिरो… मागील २६८ दिवसांपासून एकही सुट्टी न घेता ‘हा’ डॉक्टर करतोय रुग्णसेवा
3 National Duty to Father Duty : मुलगा अगस्त्यला बाटलीतून दूध पाजताना हार्दिकचा फोटो व्हायरल
Just Now!
X