18 November 2017

News Flash

Viral Video : ब्रेकऐवजी पाय पडला एक्सलरेटरवर आणि …

संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

मुंबई | Updated: August 18, 2017 11:44 AM

पार्किंगमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात हे दृश्य कैद झालंय.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. पार्किंगमध्ये झालेल्या विचित्र अपघाताचा हा व्हिडिओ आहे. सातव्या मजल्यावरून एक गाडी खाली उभ्या असलेल्या गाडीवर पडली आणि या दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पार्किंगमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात हे दृश्य कैद झालंय. जेव्हा हा अपघात होण्याचं कारण समजलं, तेव्हा मात्र अनेकांनी डोक्यावर हात मारला.

टेक्सासमधला हा व्हिडिओ आहे. सातव्या मजल्यावर असणाऱ्या पार्किंग स्पेसमध्ये एक महिला आपली गाडी पार्क करत होती. पण पार्क करताना तिचा पाय चुकून एक्सलरेटरवर पडला आणि तिची गाडी बॅरिकेट्स तोडून सातव्या मजल्यावरून थेट खाली पडली. याचवेळी एक चालक आपली गाडी पार्क करण्यासाठी जागा शोधत या ठिकाणी आला होता. त्यानं आपली कार जरा पुढे नेली आणि तेवढ्यात वरून आलेली कार त्याच्या गाडीवर पडली. या अपघातात सुदैवानं ती महिला आणि कारचालक दोघंही बचावले.

First Published on August 18, 2017 10:30 am

Web Title: horrific moment when car come down crashing from seventh floor