News Flash

चहलने पोस्ट केला रोमँटिक फोटो; होणाऱ्या पत्नीने केली भन्नाट कमेंट

पाहा नक्की काय म्हणतेय धनश्री...

चहलने पोस्ट केला रोमँटिक फोटो; होणाऱ्या पत्नीने केली भन्नाट कमेंट

IPLचा १३वा हंगाम मोठ्या जल्लोषात खेळला गेला. स्पर्धेत अनेक अनुभवी आणि नव्या दमाच्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने साऱ्यांना खुश केले. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल यानेदेखील आपल्या फिरकी गोलंदाजीने चाहत्यांना आनंदित केले. IPL संपवल्यानंतर आता तो यू-ट्युबर धनश्री वर्मासोबत कधी लग्नाच्या बेडीत अडकणार याची सर्वत्र चर्चा रंगल्याचे दिसत आहे. धनश्री दुबईला IPLच्या सामन्यांना हजेरी लावताना दिसली. पण IPL संपल्यानंतर युजवेंद्र चहल ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आणि धनश्री पुन्हा भारतात परतली. तरीदेखील या जोडीची एका फोटोमुळे जोरदार चर्चा रंगली आहे.

युजवेंद्र चहलचा ऑगस्ट महिन्यात यू-ट्युबर धनश्री वर्मासोबत घरच्या घरी छोटेखानी साखरपुडा झाला. त्यानंतर धनश्री आपल्या कामात व्यस्त होती आणि चहल IPLसाठी युएईला रवाना झाला. चहलला चीअर करण्यासाठी धनश्रीने दुबईच्या मैदानावर हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांच्या एका रोमँटिक फोटोची जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर आता चहलने आणखी एक रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे. दुबईच्या समुद्रकिनाऱ्यावर धनश्रीने हा फोटो काढल्याचं दिसत आहे. युएईमध्ये निसर्गरम्य ठिकाणी काढलेल्या या फोटोवर धनश्रीनेदेखील झकास कमेंट केली आहे. “एकदम मस्त सेल्फी… अगदी पट्टीच्या फोटोग्राफरने फोटो काढावा तसा फोटो…” अशी कमेंट करत तिने स्वत:चच मजेशीर कौतुक केलं आहे.

दरम्यान, धनश्री वर्मा ही भारतातल्या प्रसिद्ध यू-ट्युबर पैकी एक मानली जाते. तिच्या यू-ट्युब चॅनलचे २ मिलियन फॉलोअर्स आहेत. अनेकांना चहल आणि धनश्री वर्माच्या या बातमीने आश्चर्याचा धक्का बसला होता. लॉकडाउन काळात चहल घरात बसून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत होता. अनलॉक काळात चहलने सरावासाठी सुरुवात केली होती पण टीक-टॉकच्या व्हिडीओमुळे तो अधिक चर्चेत असायचा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2020 4:54 pm

Web Title: hot romantic couple photo dhanashree verma youtube sensation team india cricketer yuzvendra chahal sunset in uae beach dubai love stuck vjb 91
Next Stories
1 रोनित रॉयच्या मुलाने Amazon वरुन मागवली गेमची सीडी; घरी आला कोरा कागद, अभिनेता संतापला
2 इव्हांका ट्रम्प यांनी शेअर केले मोदींसोबतचे फोटो, भारत-अमेरिका ‘घनिष्ठ मैत्री’चा केला उल्लेख
3 मुंबई : १० रुपये भाड्याने पुस्तकं देणाऱ्या व्यक्तीने शिकवला जीवनाचा ‘धडा’, IAS ने शेअर केली ‘बोलकी’ पोस्ट
Just Now!
X