रविवार म्हणजे सुटी. आनंदाचा दिवस. पण रविवारी कामावर बोलावणं एका मालकाला चांगलंच महागात पडलं आहे. हॉटेलमध्ये भांडी घासणाऱ्या महिलेला कामावर बोलवल्यामुळे १५०कोटींचा फटका बसला आहे. चर्चला जायचे असताना कामावर बोलवण्यात आले, अशी तक्रार महिलेने न्यायालयात केली होती. याप्रकरणी मियामीतील न्यायालयाने १५० कोटी रूपये मोबदला देण्याचे आदेश दिले आहेत.

मेरी ज्या पियरे या हिल्टन ग्रुपचा भाग असलेल्या कोनराड मियामी हॉटेलमध्ये सहा वर्ष कामाला होत्या. त्याचबरोबर त्या कॅथलिक मिशनरी गु्रपच्या सोल्जर ऑफ क्राईस्ट चर्चच्या सदस्या आहेत. गरिबांना मदत करण्याचे काम हा गु्रप करतो. दरम्यान, २०१५मध्ये हॉटेलच्या किचन मॅनेजरने मेरी यांना रविवारी कामावर बोलाविण्याची मागणी केली होती. मेरी यांनी सुटी देण्याऐवजी सहकर्मचाऱ्यांसोबत शिफ्ट देण्याची मागणी केली होती. यावर हॉटेल व्यवस्थापनाने पादरीचे पत्र आणण्यास सांगितले होते. मात्र, याची माहिती त्यांनी आपल्याला दिली नव्हती. त्यांना रविवारी सुटी कशासाठी हवी होती, असे हिल्टन प्रशासनाने म्हटले होते.

याच दरम्यान, हॉटेलने व्यवस्थापनाने खराब काम करीत असल्याचे कारण सांगत २०१६ मध्ये कामावरून कमी केले होते. २०१७ मध्ये नागरी हक्क कायद्याप्रमाणे मेरी यांनी याचिका दाखल केली होती. आपण धार्मिक कारणामुळे रविवारी कामावर जाण्यास असमर्थ होतो, असा दावा मेरी यांनी याचिकेत केला होता. न्यायालयाने मेरी यांचा दावा ग्राह्य त्यांना १५० कोटी रूपये मोबदला देण्याचे आदेश दिले. तसेच मेरी यांची ३५ हजार डॉलर थकीत रक्कम आणि मानसिक त्रास दिल्याबद्दल ५ लाख डॉलर अतिरिक्त देण्याचेही आदेश दिले आहेत.

न्यायाधीशांच्या निर्णयावर आपण खुश नाही. नोकरीच्या काळात मेरी यांना अनेक सुविधा देण्यात आल्या. तसेच धार्मिक भावनांचाही आदर करण्यात आला. मात्र, निर्णय सादर करण्यात आलेल्या तथ्यांनुसार झाला की, कायद्यानुसार हे कळत नाहीये, अशी प्रतिक्रिया हिल्टन ग्रुपच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केली.