News Flash

‘हाॅवरबोर्ड’नंतर आता ‘हाॅवरबाईक’

उडणाऱ्या बाईकवर व्हा स्वार!!

‘हाॅवरबोर्ड’नंतर आता ‘हाॅवरबाईक’
हाॅवरबाईक स्काॅर्पिअन ३

‘हाॅवरक्राफ्ट’ आणि ‘हाॅवरबोर्ड’नंतर आता ‘हाॅवर’ करणारी एक नवी गोष्ट आली असून आता बाईक प्रेमींसाठी ‘हाॅवरबाईक’ विकसित करण्यात आली आहे. ही हाॅवरबाईक चक्क उडते. हाॅवरसर्फ या कंपनीने ही बाईक विकसित केलेली आहे. या बाईकचं नाव आहे स्काॅर्पिअन-३ आणि ही जगातली पहिली हाॅव्हरबाईक असल्याचं या कंपनीने म्हटलं आहे. सिंगल सीटची ही उडणारी बाईकचं उत्पादन अजूनतरी मोठ्य़ा प्रमाणावर सुरू झालेलं नाहीये.

ही बाईक ड्रोन क्वाड काॅप्टर टेक्नाॅलाॅजीवर आधारित असल्याचं या कंपनीने सांगितलं आहे. या उडणाऱ्या बाईकचे कंट्रोल्स पूर्णपणे त्या चालकाच्या हातात असतात. त्यामुळे स्वत:च एक उडणारं वाहन चालवत असल्याचा वेगळाच अनुभव चालकाला मिळतो. त्यामुळेच ही हाॅव्हरबाईक एक उत्सुकतेचा विषय ठरलार आहे.

हल्ली सभा, मोर्चे किंवा मोठ्या कार्यक्रमांमध्ये काॅमन झालेल्या ड्रोनसारखीच टेक्नाॅलाॅजी या हाॅव्हरबाईकमध्ये वापरण्यात आलीये. पण एकाच्या ठिकाणी चार ड्रोनकाॅप्टर्स या बाईकला लावण्यात आले आहेत.

आता यापुढे या बाईक्सचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झालं तर नेहमीसारख्या रस्त्यावर धावणाऱ्या बाईक्स आणि कार्सएवजी ही हाॅव्हरबाईकच सगळेजण वापरतील असं हाॅवरसर्फ कंपनीने म्हटलंय.

हा काॅन्सेप्ट जाम भन्नाट आहे. रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांएेवजी या बाईक्स जर सर्वसामान्यांना वापरायला मिळाल्या तर एरव्ही ट्रॅफिक जॅममध्ये तासन् तास अडकून राहणारे आपण सर्वजण अगदी सहज आणि उडत उडत आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोचू शकतो. जर असं झालं तर १९९०च्या दशकात कार्टून नेटवर्कवर प्रदर्शित होणाऱ्या ‘द जेटसन्स’ या कार्टूनमध्ये दाखवल्यासारखं विश्व प्रत्यक्षात उतरेल. ही हाॅव्हरबाईक कशी काम करते पाहायचंय? पहा खालचा व्हिडिओ

सौजन्य – यूट्यूब

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2017 7:09 pm

Web Title: hoversurf company makes a flying hoverbike
Next Stories
1 व्हिडिओ: हाॅटेलमध्ये शिरली भली मोठी पाल!
2 वन्यजीवांसाठी ‘तो’ ठरला देवदूत
3 राजाच्या वाढदिवसाला कोण कोण येणार?
Just Now!
X