News Flash

World No-Tobacco Day : धूम्रपान सोडण्यासाठी करा हे उपाय..

प्रयत्न करुनही काही जणांना ते शक्य होत नाही. अशा धूम्रपान सोडू इच्छिणार्‍यांसाठी काही उपाय...

धूम्रपान हे आरोग्याला घातक आहे, हे वेगळे सांगायला नको. धूम्रपानाचा संबंध कॅन्सरशी असलेला सर्वसाधारण संबंध लोकांना माहीत आहे. मात्र धूम्रपान हे उच्च रक्तदाबापासून ते ह्रदयविकाराच्या झटक्यापर्यंत आणि मधुमेहापासून नपुंसकत्वापर्यंत विविध आजारांना कारणीभूत ठरु शकते. मानवी जीवनाचा अकाली शेवट करण्यास कारणीभूत सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे धूम्रपान. त्यामुळे सिगरेटचा पहिला झुरका मारताना हा आपल्याला अकाली स्मशानाकडे नेणार आहे, हे शहाण्या माणसाने ध्यानात घ्यावे. कारण एकदा धूम्रपानाच्या चक्रात माणूस अडकला की त्यातून बाहेर पडणे कठीण असते. धूम्रपानाचे हे व्यसन प्रत्यक्षात त्यामध्ये असलेल्या निकोटिनमुळे असते. तंबाखुमध्ये असलेल्या निकोटिनची शरीराला अशी काही चटक लागते की माणूस त्यापासून दूर राहू शकत नाही. वास्तवात धूम्रपानाला नादावलेले अनेक जण असे असतात, जे त्या व्यसनामधून बाहेर पडू इच्छितात. मात्र प्रयत्न करुनही काही जणांना ते शक्य होत नाही. अशा धूम्रपान सोडू इच्छिणार्‍यांसाठी काही उपाय…

  • ध्रुम्रपान सोडण्याचा दृढनिश्चय करावा
  • ‘राष्ट्रीय तंबाखू शमन हेल्पलाइन’ अर्थात ‘क्विटलाइन’ची मदत घेऊ शकता. धूम्रपानाचं व्यसन असणारे १८००-२२७७८७ या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी करून या हेल्पलाइनची मदत घेऊ शकता. या हेल्पलाइनद्वारे तुम्हाला इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, गुजराती आणि बंगाली भाषांमध्ये समुपदेशन मिळते.
  • निकोटीन पॅच : यामुळे तुमच्या शरिरातून निकोटीनचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. मानेच्या किंवा दंडाच्या केसरहित त्वचेवर हा पॅच लावण्यात येतो. हा पॅच दिवसाला किमान १६ तास ठेवला जातो. हा इलाज आठ आठवडय़ांनी थांबवता येतो.
  • निकोटीन गम : निकोटीनवाला च्युईंग गम दाढेत धरून ठेवायचा असतो. दर अर्ध्या तासाने च्युईंग गमचा चावा घेतला की ती मिरमिरते. तेवढा काळ दाढेतून निकोटीन शोषलं जातं. तोंडात च्युईंग गम असताना त्यावेळी काहीही खाणे किंवा पिणे वर्ज्य करावे. हा उपाय सलग 12 आठवडे केल्यास धुम्रपान सोडण्यात मदत होते.
  • निकोटीन लॉझेन्जेस : या लिमलेटी गोळ्यांचा चावा न घेता त्या नुसत्याच चघळायच्या असतात. त्या काळातही काही खाता-पिता येत नाही.
  • निकोटीन स्प्रे आणि इनहेलर : या दोन्ही प्रकारातले औषध नाका-तोंडातूनच शोषले जाते. इनहेलरचा मोठा फायदा म्हणजे तो सिगारेटसारखाच ओठात धरता येतो. यामुळे तुम्हाला आपण जणू काही सिगारेट ओढत आहोत असा भास होतो आणि नकळत उपचारही होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 5:31 pm

Web Title: how to quit smoking
Next Stories
1 व्यसन नव्हे औषध म्हणून तंबाखूचा वापर
2 तोडल्या धर्माच्या भिंती! आजारी मुस्लिम चालकासाठी हिंदू अधिकाऱ्याचा रोजा
3 अश्लील जाहिरातींवर भारतीय रेल्वेचा ‘पोलखोल’ खुलासा
Just Now!
X