19 September 2020

News Flash

viral video: धोका पत्करून समुद्र किनारी फोटो काढण्याआधी हा व्हिडिओ पहाच!

डेविल्स टियरवर ही महिला टायटॅनिक पोज देऊन फोटो काढण्यासाठी उभी होती

धोका पत्करून समुद्र किनारी फोटो काढण्याआधी हा व्हिडिओ पहाच!

सध्या सोशल मीडियावर अंगावर शहारे आणणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक महिला पर्यटक समुद्र किनारी असणाऱ्या खडकावर फोटो काढण्यासाठी उभी होती. यावेळी आलेल्या लाटेच्या तडाख्याने ही महिला बाहेर फेकली गेली. Shanghaiist च्या मते हा व्हिडिओ इंडोनेशियाच्या नुसा लेम्बोंगनच्या डेविल्स टीयर बेटावरील आहे. लाटेच्या तडाख्यामुळे वाहून गेलेली महिला सुदैवानं सुरक्षित असल्याचे समजत आहे.

डेविल्स टियरवर ही महिला टायटॅनिक पोज देऊन फोटो काढण्यासाठी उभी होती. मात्र फोटो काढण्याचा मोह तिला चांगलाच भोवला. समुद्रातील खडकांवर उभी राहून फोटो काढण्यात मग्न असणाऱ्या या महिलेला लाटेचा अंदाज आला नाही. मागून मोठी लाट आली लाटेच्या तडाख्यामुळे ही महिला बाजूला फेकली गेली.

सुदैवाने ही महिला सुरक्षित असून तिला किरकोळ इजा झाल्या आहेत. बालीच्या एका इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. समुद्राजवळची जागा धोक्याची असते, त्यामुळे लोकांनी फोटोसाठी धोका पत्करू नये असं आवाहन या व्हिडिओद्वारे करण्यात आले आहे. डेविल्ड समुद्र किनारा इंडोनेशियातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे हजारो लोक समुद्र किनाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी येतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 5:53 pm

Web Title: huge wave sweeps away woman posing on cliff viral video
Next Stories
1 चर्चा तर होणारच! Wanted पोस्टरमध्ये पोलिसांनी लावला आरोपीचा बालपणीचा फोटो
2 #PMNarendraModiTrailer: ‘मोदींच्या बायोपिकवर बंदीची भाजपाचीच मागणी’, मिम्स झाले व्हायरल
3 समुद्र किनाऱ्यावर मृतावस्थेत सापडला दुर्मिळ सनफिश
Just Now!
X