04 March 2021

News Flash

Video : गरोदर स्त्रीसाठी नवराच झाला खुर्ची!

गर्भवती स्त्री समोर उभी असूनही एका व्यक्तीनेही तिला बसण्यासाठी जागा दिली नाही

आई होणं ही जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. एका नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे घरातलं संपूर्ण वातावरण आनंदी होऊन जातं. त्यामुळे त्याच्या आगमनासाठी सारेच उत्सुक असतात. या काळात आईचीदेखील विशेष काळजी घेतली जाते. अगदी तिचे खाण्या-पिण्याचे हट्ट पुरवले जातात. तिच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. समाजात वावरतानादेखील गर्भवती स्त्रियांना कोणतीही मदत लागली तर लोक लगेच त्यांच्या मदतीसाठी तत्पर असतात. परंतु चीनमध्ये एका गर्भवती महिलेसोबत काही लोकांनी जे वर्तन केलं ते पाहून नक्कीच कोणाचाही राग अनावर होईल. परंतु त्याचक्षणी या महिलेच्या नवऱ्याने तिची ज्या पद्धतीने काळजी घेतली ते पाहून त्यांचं कौतुक करावंसं वाटेल. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

चीनमधील हीनेंग येथे एक गर्भवती महिला आपल्या पतीसोबत दवाखान्यात तपासणीसाठी गेली होती. रुग्णालयात गर्दी असल्यामुळे या महिलेला बसण्यासाठी जागादेखील नव्हती. विशेष म्हणजे तिच्यासमोर काही खुर्च्या होत्या, मात्र त्यावर काही जण आधीपासूनच बसले होते. परंतु गर्भवती स्त्री समोर उभी असूनही एकाही व्यक्तीने तिला बसण्यासाठी जागा दिली नाही. बराच वेळ उभं राहिल्यामुळे ही महिला थकली आणि तिला त्रास होऊ लागला. तिचा हा त्रास पाहावला न गेल्यामुळे तिचा नवराच तिच्यासाठी खुर्ची झाला. तो जमिनीवर बसला आणि महिलेला त्याचा पाठीवर बसण्यास सांगितलं.


दरम्यान, या जोडप्याकडे पाहून समोर खुर्चीवर बसलेल्या एकाही व्यक्तीला ओशाळल्यासारखं झालं नाही. तरीदेखील ते तसेच बसून होते. त्यांच्या या वर्तनावरुन माणूसकी लोप पावत चालल्याचा प्रत्यय आला. हा व्हिडीओ आतापर्यंत २३२.६ जणांनी पाहिला असून त्याला हजारोंच्या संख्येने लाइक्स मिळत आहेत. तर ३.४ हजार वेळा त्याला रिट्विट करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 3:13 pm

Web Title: husband becomes a chair for his pregnant wife at hospital video viral ssj 93
Next Stories
1 Video : आगीतून वाचवले अस्वलाच्या पिल्लाचे प्राण; पुढे जे झालं ते वाचून व्हाल भावूक
2 Video : एकदम झकास…! आजीबाईंच्या डान्सवर आनंद महिंद्रा खूश
3 चमत्कार… विधवा झालेल्या पत्नीला सहा वर्षानंतर भेटला पती
Just Now!
X