News Flash

पत्नीच्या अफेअरचा शोध पतीनं घेतला गुगल मॅपच्या मदतीने

पत्नीला याबाबत विचारणा केली तेव्हा तिनेही लगेचच अफेअरची कबुली दिली. अशाप्रकारे पत्नीचे अफेअर समोर आल्यावर पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

तंत्रज्ञानामुळे सध्या जगणे बऱ्याच प्रमाणात सोपे झाले आहे असे म्हणता येईल. या तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन गोष्टींसाठी करणे आणि वेळ वाचवणे हे ठिक आहे. पण एका पतीने तंत्रज्ञानाचा वापर करुन आपल्या पत्नीचे अफेअर शोधून काढले आहे. गुगल मॅपच्या साह्याने त्याने ही गोष्ट शक्य करुन दाखवली आहे. आपल्याला अगदी कुठेही जायचे असेल तरी आपण अगदी सहज गुगल मॅपचा वापर करतो. पण याचा एका पतीला असाही वापर होऊ शकतो याची आपण कल्पनाही केली नसेल. पण पेरु देशातील एका व्यक्तीने पेरू देशातील एका व्यक्तीने रस्ता शोधत असताना त्याच्या पत्नीला बॉयफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं आहे.

गुगल मॅपचा वापर करुन ठराविक ठिकाणी जात असताना त्याने ‘स्ट्रीट व्हियू’ या पर्यायाचा वापर केला. यातील फोटोग्राफ्स पाहताना त्याला आपल्या ओळखीचे कोणतरी असल्याचे त्यामध्ये दिसले. मग ही आपली पत्नीच असल्याचे त्याला लक्षात आले.

यामध्ये पांढरा शर्ट, ब्लॅक जिन्स घातलेली स्त्री एका बेंचवर बसली आहे. तिच्या मांडीवर एक पुरुष डोकं ठेवून झोपलेला हा फोटो आहे. ही आपलीच पत्नी असल्याचे त्याने ओळखले. मग कारने तो त्याठिकाणी पोहोचला आणि पत्नी आणि तिच्या प्रियकराचे फोटोही काढले. पतीकडे फोटो असल्याचे समजल्यावर पत्नीला याबाबत विचारणा केली तेव्हा तिनेही लगेचच अफेअरची कबुली दिली. अशाप्रकारे पत्नीचे अफेअर समोर आल्यावर पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. ही घटना काहीशी जुनी आहे. मात्र या पतीने आता याबाबतचे फोटो फेसबुकवर टाकले असून त्याची माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 8:01 pm

Web Title: husband found wife with her boyfriend extramarital affair just because of google map
Next Stories
1 ग्राहकांना सुखद धक्का… अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देणार घरांचा ताबा
2 कधी ऐकलंय का? गे पेंग्विन जोडपंही अंडी उबवतं
3 अबब ! स्टाफ मीटिंग सुरु असताना छतावरुन पाच फूट अजगर पडला खाली
Just Now!
X