व्हॅलेंटाईनला आपला जोडीदार काय गिफ्ट देणार याबाबत सगळ्यांमध्येच उत्सुकता असते. कधी आपल्याला हवे ते गिफ्ट मिळते तर कधी मिळालेल्या गिफ्टवर समाधान मानण्याची वेळ येते. नुकत्याच झालेल्या व्हॅलेंटाईन डे ला अमेरिकेतील एका पतीने आपल्या पत्नीला व्हॅलेंटाईन गिफ्ट म्हणून १० डॉलरची लॉटरी दिली. आता लॉटरी गिफ्ट म्हणून ही पत्नी नवऱ्यावर काहीशी निराश झाली. लॉटरी म्हटल्यावर ती लागली तर ठिक नाहीतर वायाच जाणार. पण या पत्नीचे नशीब इतके चांगले की तिला ती लॉटरी लागली आणि चक्क १० लाख डॉलर म्हणजेच ६४,५६,५०० रुपये मिळाले.

अमेरिकेत राहणारी सिंथिया होलमेस ही महिला ५४ वर्षांची आहे. आपल्याला लॉटरी लागली आहे यावर आपला किती वेळ विश्वासच बसत नव्हता. शेवटी माझे नाव जाहीर झाले हे पाहण्यासाठी मी लॉटरीच्या मुख्य कार्यालयात गेले. तिथे माझे नाव असल्याची खात्री केल्यानंतर माझा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसला. वॉलमार्टमध्ये नोकरीला असूलेल्या होलमेस या लॉटरी लागल्याचे ऐकल्यावर माझ्या अंगावर शहारा उभा राहील्याचेही म्हणाल्या. पण या गोष्टीमुळे आपल्याला अतिशय आनंद झाला असून पतीने दिलेल्या गिफ्टमुळेच हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अचानकपणे इतक्या रुपयांची मालकीण झालेल्या होलमेस खऱ्या अर्थाने मालामाल झाल्या म्हणायला हरकत नाही.