हैदराबादची महापालिका निवडणूक ही भाजपानं प्रतिष्ठेची बनवली होती. खासदार तेजस्वी सूर्या, स्मृती इराणी या आक्रमक नेत्यांबरोबरच प्रकाश जावडेकर, देवेंद्र फडणवीस यांनी देखील हैदराबादचा दौरा केला होता. त्यानंतर योगी आदित्यनाथ, जे. पी. नड्डांंबरोबरच अमित शाह यांनी देखील हैदराबादमध्ये प्रचार केला होता. भाजपाने एकापाठोपाठ एक नेत्यांची रांग पालिका प्रचारासाठी उभी करत ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनवली होती. या निवडणुकांची आज मतमोजणी होत असून प्राथमिक कलांनुसार भाजपाने ८० जागांवर आघाडी मिळवल्याचे चित्र दिसत होतं. मात्र नंतर भाजपा झपाट्याने पिछाडीवर पडल्याचे चित्र दिसलं. आता यावरुनच सोशल नेटवर्किंगवर भाजपा समर्थक आणि विरोधकांमध्ये हॅशटॅग वॉर सुरु झाली आहे. #HyderabadElection तसेच #भाग्यनगर_मे_भगवाधारी हे हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहे. मात्र सुरुवातीला आघाडी घेत नंतर पिछाडीवर पडल्याने विरोधकांनी भाजपाला ट्रोल केलं आहे.

हैदराबाद महानगरपालिकेच्या १३० जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपानं सध्या ८७ जागांवर आघाडी घेतली होती. परंतु नंतर भाजपा पिछाडीवर असून टीआरएसनं ६५ जागांवर आघाडी घेतल्याचं चित्र मतमोजणी सुरु झाल्यानंतर काही तासांनी दिसू लागलं. असुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने ३२ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळेच आता अनेकांनी सोशल नेटवर्किंगवर ट्रोल केलं आहे.

१) हे कधी झालं?

२) असं काहीतरी झालं

३) एवढ्या झपकन्…

४) हा प्रँक आहे

५) असं झालं म्हणे…

६) भाजपा समर्थक

७) अचानक

८) महापौर पदासाठी

९) धोरण

१०) समर्थकांवरही साधला निशाणा

यापूर्वी २०१६ मध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भाजपा युतीला केवळ ५ जागांवर विजय मिळाला होता. यापूर्वी सर्वच पक्षांनी या निवडणुकीत स्वत:ला झोकून दिल्याचं दिसलं होतं.