रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ८९ धावांनी दारूण पराभव केला. त्यानंतर या पराभवाचा बदला घेणार असल्याचे पाकिस्तीनी वंशाचा ब्रिटीश बॉक्सर आमिर खान यांने निर्धार केला आहे. पाकिस्तानी संघाला फिटनेससाठी मदत करायला तयार असल्याचेही तो म्हणाला आहे.

‘फादर्स डे’ला मॅन्चेस्टरमध्ये झालेल्या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानच्या संघावर चारीबाजूनं टीका होत आहे. फिटनेस, नेतृत्व, संघनिवड आणि कामगिरीवर टीकास्त्र सोडलं जातेय. अशांमध्ये भारताविरोधातील पराभवाचा वचपा काढणार असल्याचे बॉक्सर आमिर खान यांने ट्विटरद्वारे म्हटले आहे.

पाकिस्तानी वंशाचा असलेल्या आमिर खान मॅन्टेस्टरमध्ये वाढला आहे. तो पेशेवर सर्किटमध्ये विश्वविजेता आहे. त्याचा पुढील सामना भारताचा बॉक्सर नीरज गोयतसोबत होणार आहे. या सामन्यात क्रिकेटमध्ये झालेल्या माणहाणीकारक पराभवचा बदला घेणार आहे.

काय आहे ट्विट?
विश्वचषकामध्ये भारताविरोधात पाकिस्तानचा पराभव झाला. मी या पराभवचा बदला घेणार आहे. साऊदी अरबमध्ये १२ जुलै रोजी होणाऱ्या सामन्यात भारताच्या नीरज गोयतचा पराभव करणार आहे.

बॉक्सर आमिर खानला भारताचा बॉक्सर आमिर खान यानेही ट्विट करत जोरदार पंच मारला आहे. डब्ल्यूबीसी आशियाचा विजेता नीरज गोयत ट्विटमध्ये म्हणतोय, ‘ स्वप्न पाहत राहा आमिर खान, तू माझ्या सोबत भारताचा विजयही पाहशील.’

भाराताविरोधात झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान संघाच्या फिटनेसवर चाहत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर आमिर खान धावून आला आहे. तो म्हणाला की, पाकिस्तानी संघाच्या फिटनेस आणि एकाग्रता वाढवण्यासाठी मी मदत करायला तयार आहे.

भारताविरोधातील पराभवानंतर पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी संघावर टीकास्त्र सोडलं आहे. नाणेफेक जिंकून पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमद याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय अनेक पाकिस्तानी चाहत्यांना फारसा रुचला नाही. त्यांनी तशी नाराजी सोशल नेटवर्किंगवरुन व्यक्त केली आहे. पाकिस्तानी संघाचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर तर सरफराजच्या या निर्णयावर चांगला नाराज असून त्याने सरफराजला ‘अक्कल शून्य कर्णधार’ म्हटले आहे.