चॅम्पियन्स करंडक २०१७ स्पर्धेत भारताने बांगलादेशवर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश केलाय. या Champions Trophy मध्ये एकीकडे बांगलादेश संघावर सोशल मीडियावर ट्रोलिंग होत असताना दुसरीकडे कॅप्टन विराट कोहलीचा सामन्यातला एक फोटो देखील व्हायरल होत आहे. एरव्ही विराट कोहलीच्या चर्चा तशाही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्याची मैदानातली तुफान खेळी, कॅप्टन म्हणून त्याचे नेतृत्त्वगुण, त्याने एकदिवसीय सामन्यात रचलेला विक्रम, त्याची हटके स्टाईल, त्याची हेअर स्टाईल, अनुष्कासोबतचं प्रेमप्रकरण असो एकूण एक गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

वाचा : रविवारी ठरणार सुपर संडे!, भारत-पाकचे संघ दोनदा मैदानात भिडणार

पण सध्या एका वेगळाच कारणासाठी तो चर्चेत आलाय. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराटने विकेट गेल्यानंतर जी काही ‘रिअॅक्शन’ दिली, ती रिअॅक्शन सोशल मीडियावरचं नवं मीम ठरलं आहे. मुशफिकर रहीमची विकेट घेतल्यावर विराटला जो काही आनंद झाला तो त्याने अशा प्रकारे व्यक्त केला. अर्थात त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद कॅमेरामनपासूनही लपून राहिला नाही. तेव्हा या सामन्यात भारताच्या विजयानंतर जर का कोणत्या गोष्टींने क्रिकेटप्रेमीच्या चेहऱ्यावर हसू आणलं तर तो विराटचा हा फोटो होय.

Viral Video : लाट आली धावून अन् रिपोर्टर गेला वाहून