मुस्लीम बहुल देशातील कट्टरतावादी लोकांना अमेरिकेत येण्यास नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बंदी घातली आहे. सीरियातील निर्वासितांना आणि इतर काही देशांतील लोकांना पुढील सूचनेपर्यंत प्रवेश न देण्याच्या आदेशावर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. या आदेशानुसार इराण, इराक, सीरिया, येमेन, सुदान, लिबिया, सोमालिया या देशांच्या लोकांना ३० दिवस प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, सौदी अरेबिया या देशातील लोकांची कसून तपासणी केली जाईल असे सांगण्यात आले. या भूमिकेचा अमेरिकाच काय पण जगभरातून तीव्र विरोध होत आहे त्यामुळे अमेरिकेने नाकारलेल्या या निर्वासितांना आर्इसलँडच्या राष्ट्रध्यक्षांनी आपल्या देशाचे दार खुले केले आहे. आइसलँडचे राष्ट्राध्यक्ष गुडनी जोहॅन्सेन यांनी २६ सीरियन निर्वासितांना आपल्या देशात येण्याचे निमंत्रण दिले आहे. हे निर्वासित लवकरच आइसलँडच्या आश्रयाला जाणार आहेत.

सिरियामध्ये सुरु असलेल्या नागरीयुद्धामुळे निर्वासितांचे लोंढचे च्या लोंढे युरोपात दाखल झाले होते. त्यामुळे निर्वासित हे युरोप आणि अमेरिकेची डोकेदुखी बनत चालला आहे. नव्याने राष्ट्राध्यक्ष झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी २७ तारखेला प्रोटेक्शन ऑफ द नेशन फ्रॉम फॉरेन टेररिस्ट एंट्री इन टू द युनायटेड स्टेट्स या शीर्षकाच्या आदेशावर स्वाक्षरी केली या आदेशानुसार इराण, इराक, सीरिया, येमेन, सुदान, लिबिया, सोमालिया या देशांच्या लोकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली. या निर्णयाचा जगभरातून विरोध होत आहे. असे असताना आइसलँडचे राष्ट्राध्यक्ष गुडनी जोहॅन्सेन यांनी निर्वासितांना आपल्या देशाचे दार खुले करून एक चांगले उदाहरण जगासमोर ठेवले आहे. आइसलँडने २६ निर्वासितांसाठी आपल्या देशाचे दार खुले केले आहेत ज्यात तेरा लहान मुलांचा समावेश आहे.