News Flash

फोटोतल्या या मुलाला ओळखलंत का?? सध्या भारतीय क्रिकेट संघात आहे महत्वाचा खेळाडू

सोशल मीडियावर शेअर केला बालपणीचा फोटो

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात सर्व भारतीय क्रिकेटपटू घरात बसून होते. अनेकांनी या काळात आपल्या परिवारासोबत वेळ घालवणं पसंत केलं. सध्या बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाची घोषणा केली असून सर्व भारतीय खेळाडू यासाठी तयारीला लागले आहेत. भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार आणि मुंबईकर अजिंक्य रहाणेनेही आयपीएलच्या हंगामाची तयारी सुरु केली आहे. यंदाच्या हंगामापासून अजिंक्य दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे.

अजिंक्यने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. लहान असताना आपल्या गावी गेल्यावर बैलासमोर खेळत असतानाचा फोटो अजिंक्यने पोस्ट केला आहे. ते दिवस किती साधे होते असं म्हणत अजिंक्यने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

२०१८ साली अजिंक्य आपला अखेरचा वन-डे सामना खेळला, यानंतर त्याला भारताच्या वन-डे संघात स्थान मिळालं नाही. यानंतर अजिंक्य फक्त कसोटी क्रिकेट खेळतो आहे. वर्षाअखेरीस टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यावेळी अजिंक्यची भारतीय संघातली भूमिका महत्वाची असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 5:02 pm

Web Title: identify the kid in picture now playing as a important player in indian cricket team psd 91
Next Stories
1 Friendship Day : सचिन रमला बालपणीच्या आठवणीत
2 २०१८ चा विजय आता विसरायला हवा, कांगारुंचा संघ यंदा तयारीनिशी उतरेल – अजिंक्य रहाणे
3 IPL 2020 : RCB कर्णधार नव्या हंगामासाठी सज्ज, मागवला नवा किट
Just Now!
X