राजकीय ट्रोल्स पाठोपाठ आता गुगलही याच कारणामुळे चर्चेत आले आहे. गुगलमध्ये इडियट सर्च केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव झळकते, तर भिकारी सर्च केल्यानंतर पाकिस्तनाचे पंतप्रधान इम्रान खान यांचे नाव दिसते. या प्रकारामुळे दोन्ही देशांनी गुगलवर टीका केली आहे. त्यात आता आणखी एका नावाची भर पडली असून बार गर्ल इन इंडिया सर्च केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचं नाव दिसत आहे. त्यामुळे गुगलचा डोकं फिरलं की काय असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

तेलंगणा, मिझोराम, छत्तीसगढ, राजस्थान आणि मध्य प्रदेशात नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. निवडणूक निकालानंतर काँग्रेस आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात सोशल मीडियावर कॅम्पेन चालविण्यात आले होते. यात अनेक फेसबुक पेज, व्हाट्स अँप ग्रुपवर सोनिया गांधी राजकारणात येण्यापूर्वी बार डान्सर होत्या असा मजकूर पसरवण्यात आला होता. विशेष म्हणजे त्यांचे काही बनावट फोटोही शेअर करण्यात आलेले होते. याला सर्वाधिक सर्च करण्यात आले. त्यामुळे हे गुगलवर घडले असावे, असा तर्क लावला जात आहे. मात्र आता गुगल पाठोपाठ बिंग सर्च इंजिनवरही हे दिसत आहे.

गुगलचे सर्च इंजिन अल्गोरिदम असे काम करते –
आपण जेव्हा या सर्च इंजिनमध्ये एखादा शब्द टाइप करतो त्याच वेळेस ही संगणक प्रणाली किमान १०० कोटी वा कमाल कितीही अशा शब्दांच्या समूहांना २०० निकषांची चाळणी लावतो. हे दोनशे घटक असतात संदर्भ, लोकप्रियता, कालसापेक्षता, सदर शब्द आधी कोणाकोणाच्या संदर्भात वापरला गेलाय.. वगैरे अनेक. त्यांतनं चाळण लागून मग काही पर्याय समोर येतात. ते जवळपास अचूक असतात. कारण इतके शब्द आणि त्यांच्या छाननीचे निकष याच्यापेक्षा वेगळं काहीच नसतं.