26 February 2021

News Flash

Viral : गजराजांना वाट बघण्याचा आला कंटाळा, फाटक टाकले तोडून

अपघात थोडक्यात टळला

पश्चिम बंगालमधल्या जलपागरी इथला हा व्हिडिओ आहे.

एखाद्या गोष्टीसाठी वाट बघत बसायचं म्हणजे किती कंटाळवाणं काम, एकदा का प्रतीक्षा करण्याची परिसिमा गाठली की मग टाळकं फिरलच समजा. आता हेच बघा ना तिकिटाच्या रांगेत पाच मिनिटे जरी ताटकळत उभं राहवं लागलं तरी अनेकांचा पारा चढतो. आता आपली ही स्थिती मग प्राण्यांचं काय म्हणावं. पश्चिम बंगालमध्ये असाच एक प्रकार घडला आहे. झालं असं की गजराजांना रस्ता ओलांडून पलिकडे जायचं होतं. पण रस्त्यातून जात होता रेल्वे रुळ. आता रेल्वे जाणार म्हणून फाटक बंद करण्यात आले होते. हे फाटक आता उघडेल, थोड्यावेळात उघडेल असे गजराजांना वाटले. पण बराच वेळ झाला फाटक काही उघडेना त्यामुळे रागावलेल्या गजराजाने चक्क फाटकच तोडून टाकलं.

वाचा : अटलांटिक महासागरात सापडलेल्या या ११ वर्षांच्या मुलीची थरारक कहाणी

पश्चिम बंगालमधल्या जलपागरी इथला हा व्हिडिओ आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. इथून रेल्वेमार्ग जातो. रेल्वेच्या वेळेत अपघात होऊ नये यासाठी फाटक बंद केलं जातं. त्यादिवशीही फाटक बंद करण्यात आलं होतं. पण जंगलातल्या हत्तीला मात्र पलिकडे जाण्याची इतकी घाई होती की फाटक पायदळी तुडवून तो पुढे चालत गेला. त्याचं सुदैव इतकंच की फाटक ओलांडल्यानंतर काही मिनिटांतच तिथून ट्रेन गेली. थोडा जरी उशीर झाला असता तर मोठा अपघात झाला असता, पण हा हत्ती थोडक्यात बचावला. याचे सीसीटिव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भागात १०० हून अधिक हत्तींचा वावर आहे.

वाचा : नोकियाच्या नव्या स्मार्टफोनचे भारतात जूनमध्ये होणार आगमन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 7:16 pm

Web Title: impatient elephant breaks railway crossing barriers in west bengal
Next Stories
1 अटलांटिक महासागरात सापडलेल्या या ११ वर्षांच्या मुलीची थरारक कहाणी
2 ट्रम्प यांच्या निषेधार्थ व्हाईट हाऊसमधील मुस्लिम महिलेचा राजीनामा
3 आता घर मावेल तुमच्या खिशात
Just Now!
X