23 September 2020

News Flash

ट्रॅफिक सिग्नलला वैतागल्या असंयमी चालकानं पाहा काय केलं

ट्रॅफिक सिग्नलवर थांबायचा या व्यक्तीला इतका राग आला की असंयमी व्यक्तीनं जे कृत्य केलं ते कॅमेरात कैद झालं आहे.

असंयमी व्यक्तीनं ट्रॅफिक सिग्नल पोल तो़डून टाकला आहे

सिग्नल न पाळणारे लोक फक्त आपल्याकडेच आहे असं नाही. अनेकांना अगदी काही सेकंदही सिग्नलवर थांबणं असह्य होतं. तेव्हा अतिघाई करणारे असे लोक जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी पाहायला मिळतील. असाच एका असंयमी व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्रॅफिक सिग्नलवर थांबायचा या व्यक्तीला इतका राग आला की असंयमी व्यक्तीनं गाडीतून खाली उतरून चक्क ट्रॅफिक सिग्नलचा पोल तोडून टाकला आहे. बराच वेळ सिग्नलवर थांबूनही सिग्नल सुटला नाही म्हणून त्या व्यक्तीनं रागात सिग्नलचा पोल तोडला आहे. रस्त्यावर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरात हा व्हिडिओ कैद झाला आहे.

नंतर या प्रकारासाठी वाहतूक पोलिसांनी त्यांच्याकडून चांगलाच दंड आकारला आहे तसेच काही दिवसांसाठी त्याचा वाहतूक परवानाही रद्द केला आहे. चीनमधील एका शहरात हा प्रकार घडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2018 6:00 pm

Web Title: impatient man getting tired of waiting for the signal
Next Stories
1 कलम ३७७ संदर्भातील निकालानंतर बड्या टेक कंपन्यांनी असा साजरा केला आनंद
2 BSNL चा नवा प्लॅन, ७५ रूपयांत अनलिमिटेड कॉलिंगसह मिळवा डेटाही
3 विमानातून प़डला माशांचा पाऊस, पाहा व्हिडिओ
Just Now!
X