26 February 2021

News Flash

क्लीन बोल्ड… नेटकरी पडले पिपाणी वाजवणाऱ्या आजीबाईंच्या प्रेमात

त्यांचा फोटो हा विश्वचषकातील सर्वात सुंदर फोटो आहे असं नेटकरी म्हणतायत.

नेटकरी आजीबाईंच्या प्रेमात

भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी इंग्लंडमध्ये केवळ तरूणच नाही तर आबालवृद्धांनी गर्दी केली आहे. अशाच एक केस पार पांढरे झालेल्या आजीबाईंनी सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. या आजीबाई केवळ सामन्याचा आनंदच घेत नव्हत्या तर भारतीय फलंदाजांनी चौकार, षटकार मारल्यावर लहान मुलांसारखी चक्क पिपाणी वाजवून आनंद व्यक्त करत होत्या. त्यांचा उत्साह बघून समालोचन करणाऱ्या सौरभ गांगुली व हर्षा भोगले यांनादेखील या आजीबाईंची दखल घ्यावीशी वाटली. संपूर्ण वर्ल्ड कपमधला सगळ्यात सुंदर क्षण जोकॅमेऱ्यानं टिपलाय अशा शब्दांमध्ये गांगुलीनं या आजीबाईंचं कौतुक केलं. केवळ समालोचकच नाही तर नेटकरीही या आजीबाईंच्या ‘क्युटनेस’वर फिदा झाले आहेत. दोन्ही गालांवर भारताचा झेंडा रंगवून पिपाणी वाजवणाऱ्या या आजींची झकल टिव्हीवर दाखवल्यानंतर काही क्षणांमध्ये ट्विटवर त्यांचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. पाहुयात असेच काही व्हायरल ट्विटस

मी ९९ वर्ष वयाची असताना क्रिकेट मॅच दरम्यान

स्टार ऑफ द मॅच

जोश कसा आहे

उत्साह यालाच म्हणतात

विश्वचषकाचा चेहरा

फॅन ऑफ द डे

याहून सुंदर काय

त्यांनी विश्वचषक जिंकला

आजचा फोटो

वय केवळ आकडा आहे

दरम्यान भारताला पाठिंबा दर्शवण्यासाठी इंग्लंडच्या कानाकोपऱ्यातून भारतीय चाहते मैदानामध्ये हजर असतात. आत्तापर्यंत भारताला इंग्लंडमध्ये होम ग्राऊण्ड असल्यासारखाच पाठिंबा मिळाला आहे. मात्र या सर्व चाहत्यांमध्ये या आजी जरा खासच असल्याचं नेटकऱ्यांच म्हणणं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 6:12 pm

Web Title: ind v ban this old lady cheering for india wins the internet scsg 91
Next Stories
1 ‘तो’ षटकार ठोकून रोहितने रचला इतिहास, धोनीला टाकलं मागे
2 एका शतकी खेळीने रोहितच्या नावे झाले सहा विक्रम
3 शतक होण्याआधीच रोहित शर्माच्या नावावर झाले हे दोन विक्रम
Just Now!
X