27 February 2021

News Flash

द्रविडला प्रशिक्षक नेमा, लाजिरवाण्या कामगिरीनंतर चाहते रवी शास्त्रींवर भडकले

Ind vs Aus : दुसऱ्या डावात भारताचा डाव ३६ धावांवर आटोपला

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटी सामन्यात भारतीय संघाची दाणादाण उडाली. जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी भारतीय डावाला खिंडार पाडलं. पहिल्या डावात २४४ धावांपर्यंत मजल मारणारे भारताचे धुरंधर दुसऱ्या डावात पूर्णपणे अपयशी ठरले. विराट कोहली, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, मयांक अग्रवाल हे स्वस्तात माघारी परतले.
भारताच्या या लाजीरवाण्या कामगिरीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर टीका केली असून काहींनी तर शास्त्री यांची हकालपट्टी करत राहुल द्रविडला संधी देण्याची मागणी केली आहे. पाहूयात भन्नाट मिम्स

दुसऱ्या डावात भारतीय संघाचा एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली माघारी परतणार आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यापासून भारतीय संघाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 12:14 pm

Web Title: ind vs aus 1st test indian fans angry at ravi shastri after team india poor show in 2nd innings psd 91
Next Stories
1 २०२० मध्ये ‘किंग कोहली’ च्या शतकाची पाटी कोरीच
2 दयनीय! भारताच्या कसोटी इतिहासात विराटसेनेची लाजिरवाणी कामगिरी
3 भारतीय संघानं लाज काढली; ४६ वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रम मोडला
Just Now!
X