08 March 2021

News Flash

Video : क्रिकेटच्या मैदानावर प्रेमाला बहर, भारतीय चाहत्याची ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

क्रिकेटच्या मैदानावर बऱ्याचवेळा काही अतरंगी गोष्टी घडताना आपण पाहिल्या आहेत. मग स्टेडीयमवर उपस्थित असलेले प्रेक्षक सुरक्षा कवच मोडून खेळाडूंना भेटायला येतात तर कधी एखाद्या सामाजिक मुद्द्यावरही क्रिकेटच्या मैदानावर निदर्शन करण्यात येतात. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील सिडनी येथील दुसऱ्या वन-डे सामन्यात एका भारतीय चाहत्याने मौके पे चौका मारला आहे.

मैदानावर भारताकडून विराट कोहली आणि श्रेयस अय्यर फटकेबाजी करत असताना भारतीय चाहत्याने वेळ साधत सामना पाहण्यासाठी आलेल्या आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. महत्वाची गोष्ट म्हणजे या पठ्ठ्याच्या गर्लफ्रेंडनेही त्याला लग्नासाठी होकार देत त्याला होकार दिला. पाहा हा गोड व्हिडीओ…

दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने शतकी खेळी करत संघाला ३८९ धावांचा डोंगर उभारुन दिला. सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 3:25 pm

Web Title: ind vs aus 2nd odi indian fan prapose his australian girlfriend for marriage on sydney cricket ground psd 91
Next Stories
1 Video : भगव्या झेंड्याने वाढवली सिडनीची शान, ऑस्ट्रेलियात छत्रपतींचा जयघोष
2 फिंचला चेंडू लागल्यानंतर राहुलनं केली मस्करी, पाहा व्हिडीओ
3 Ind vs Aus : स्टिव्ह स्मिथकडून भारतीय गोलंदाजांची धुलाई, अनोखी कामगिरी करणारा दुसरा खेळाडू
Just Now!
X