इंग्लंडविरुद्धचा चौथा टी-२० सामना भारताने आठ धावांनी जिंकला. नाणेफेक जिंकणारा संघच सामना जिंकणार ही या मालिकेतील प्रथा या विजयासहीत मोडीस निघाली. भारताने पाच सामन्यांची मालिका २-२ च्या बरोबरीत आणल्याने आता पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे. असं असलं तरी या चौथ्या सामन्यातील काही निर्णयांवरुन तिसरे पंच विरेंद्र शर्मा आणि मैदानावरील पंचांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जात आहे. सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदर झेलबाद असल्याचे निर्णय हे वादग्रस्त असल्याचे अनेक भारतीय चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच भारताची फलंदाजी संपताना गुरुवारी रात्री सोशल नेटवर्किंगवर नॉट आऊट, सूर्यकुमार यादव, सॉफ्ट सिग्नल, थर्ड अम्पायर यासारखे अनेक ट्रेण्ड चर्चेत होते. विशेष म्हणजे अनेकांनी यासाठी पंचांना ट्रोलही केलं.

नक्की वाचा >> समजून घ्या : ‘सॉफ्ट सिग्नल’ म्हणजे काय?; का आहे या नियमाला क्रिकेटमध्ये एवढं महत्व?

The debut of Bharti Hexacom itself gave investors a return of 43 percent
‘भारती हेक्साकॉम’चा पदार्पणालाच गुंतवणूकदारांना ४३ टक्क्यांचा परतावा
Why Are performing satisfactorily mutual funds Rates So Low A Performance Analysis
समाधानकारक कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांची संख्या इतकी कमी कशी?
seat sharing formula of mahayuti and mahavikas aghadi
युती-आघाडीचे पहले आप! परस्परांच्या हालचालींवर लक्ष, जागावाटप रखडल्याने उमेदवारी याद्या लांबणीवर
Amit shah and narendra modi
निवडणूक रोख्यांमुळे भाजपाच सर्वाधिक मालामाल, टॉप दहा देणगीदारांकडून ३५ टक्के निधीची खैरात!

काय घडलं?

तिसऱ्या पंचांच्या खराब पंचगिरीचा फटका चौथ्या टी-२० सामन्यामध्ये भारताला बसला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात षटकार लगावत केली. त्यानंतर तुफान फटकेबाजी करत अर्थशतक केलं. अर्धशतक साजरं केल्यानंतर सूर्यकुमारचा धावगती वाढवण्याचा प्रयत्नात असतानाच सॅम करनच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. १४ व्या षटकामध्ये डेव्हिड मलानने सूर्यकुमारचा झेल मात्र. मात्र हा झेल घेताना त्याचे हात मैदानाला टेकले होते. तसेच व्हिडीओ रिप्लेमध्ये त्याने झेल पकडताना चेंडू जमीनीला टेकल्याचं दिसत होतं. मात्र पंचांनी मैदानावरील पंचांचा निर्णय बदलण्यासाठी ठोस पुरावे नसल्याचे सांगत सूर्यकुमारला सॉफ्ट सिग्नलच्याआधारे बाद ठरवलं. त्यानंतरही जोफ्रा आर्चरने टाकलेल्या १९ व्या षटकामध्ये वॉशिंग्टन सुंदरने मारलेला फटका अदील रशीदने झेलला तेव्हा त्याच्या पायांचा सीमारेषेला स्पर्श झाला होता. मात्र यामध्येही पंचांनी मैदानावरील पंचांचाच निर्णय योग्य असल्याचा निर्णय दिला.

सूर्यकुमार यादवला बाद देताना पंच जवळजवळ दीड ते दोन मिनिटं डेव्हिड मलानने पकडलेला झेल पुन्हा पुन्हा पाहत होते. अनेक भारतीयांनी सोशल नेटवर्किंगवरुन चेंडू जमीनीला टेकत असल्याचं दिसत आहे असं मत मांडलं. मात्र बराच वेळ व्हिडीओ पाहूनही तिसरे पंच विरेंद्र शर्मा यांनी सूर्यकुमार बाद असल्याचा निर्णय दिल्याने भारतीय चहाते चांगलेच खवळले. बरं यामध्ये सर्वसामान्य चाहत्यांबरोबर व्हेरिफाइट अकाऊंट असणाऱ्या अनेकांचा समावेश होता. लेखक असणाऱ्या आनंद रंगनाथन यांनाही तर पंचांची सुमार कामगिरी आणि निर्णय देण्यासाठी ते लावत असलेला वेळ पाहून, तिसऱ्या पंचांपेक्षा निवडणूक आयोग अधिक वेगाने निकाल जाहीर करतं, असा टोला ट्विटरवरुन लगावला.

अभिनेता रणवीरनेही ट्विटवरुन या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करताना, झेल सुटला होता, चेंडू मैदानाला टेकला होता असं ट्विट केलं आहे.

भारताचा माजी फलंदाज व्ही. व्ही. एस लक्ष्मणनेही मलान झेल पकडताना स्क्रीनशॉर्ट पोस्ट करत हा निर्णय बाद असा कसा असू शकतो असा प्रश्न विचारला.

तर वासिम जाफरनेही काव्याच्या मदतीने सॉफ्ट सिग्नल निर्णयावरुन फिरकी घेतली.

विरेंद्र सेहवागनेही तिसरे पंच डोळे बंद करुन निर्णय़ देतात असा टोला मजेदार फोटो शेअर करत लगावला आहे.

अनेकांनी सूर्यकुमारला बाद देण्याचा निर्णयावरुन मजेदार मिम्स शेअर केलेत. पाहुयात त्यापैकीच काही मोजके मिम्स

१) पंचाच्या दृष्टीकोनातून मलानची बोटं

२) निर्णय पाहिल्यावर…

३)असे निघून गेले तिसरे पंच

४) त्यांनी नक्कीच असं पाहिलं असणार

५) तुलना पाहा ही

६) अंधळा

अनेक वादग्रस्त निर्णय असणारा हा सामना भारताने जिंकत मालिका २-२ च्या बरोबरीत आणल्याने शनिवारी होणारा पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे.