भारताच्या ७१ व्या ‘स्वांतत्र्यदिनी’ देशभरात ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. अनेकांनी हौसेखातर ध्वजारोहण करतानाचे फोटोही सोशल मीडियावर अपलोड केले. कदाचित अनेकांसाठी हा दिवस सुट्टीचा किंवा फोटो काढण्याचा वगैरे असला तरी काहींसाठी मात्र या दिवसाचं महत्त्व फारच वेगळं होतं आणि हेच दाखवून देणारा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Independence Day 2017 : पूरही रोखू शकला नाही ‘त्यांचे’ ध्वजारोहण

वाचा : पाण्यात उभे राहून पहारा देणाऱ्या भारतीय जवानांचे फोटो व्हायरल!

उत्तर प्रदेशमधल्या बहराईच आणि सिद्धार्थनगर पोलीस स्टेशनमधले हे फोटो आहेत. पूरामुळे या ठिकाणी गुडघाभर पाणी साचलं होतं, पण तरीही युपी पोलिसांनी गुडघाभर पुराच्या पाण्यात उभं राहून ध्वजारोहणाचा सोहळा पार पाडला. उत्तर प्रदेशचे पोलीस महानिरिक्षक सुलखान सिंह यांनी हे फोटो ट्विटवर शेअर केलेत. अनेकदा उत्तर प्रदेश पोलिसांना त्यांच्या कामाबद्दल लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागतं. ते लाच घेतात असेही आरोप त्यांच्यावर होतात. पण यावेळी मात्र आपल्या कर्तव्यात खंड न पडू देता देशभक्तीचं अनोखं उदाहरण समोर ठेवत त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली.