भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात यंदा विशेष पाहुणे म्हणून ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंच्या चमूला आमंत्रित करण्यात आलेलं. या वेळी पंतप्रधानांनी दिलेल्या भाषणात त्यांनी खेळाडूंच्या भाषेसंदर्भात वक्तव्य केलं आहे. जाणून घेऊयात मोदी नक्की काय म्हणालेत….

ऑलिम्पिकनंतर परतल्यापासून अनेक भारतीय खेळाडू हे प्रसार माध्यमांना त्यांच्या मातृभाषेत किंवा हिंदीमध्ये मुलाखती देत आहेत. खास करुन सुवर्णपदक विजेत्या निरज चोप्राची हरयाणवी लहेजा असलेली भाषा अनेक मुलाखतींमध्ये ऐकायला मिळतेय. त्यावरुनच मोदींनी हे वक्तव्य केलं आहे. भाषेपेक्षा आपल्यामधील कौशल्य अधिक महत्वाचं असल्याचं यामधून मोदींनी अधोरेखित करायचं होतं.