19 September 2020

News Flash

डूकरासारखा का झालायस? पाक चाहत्याकडून लज्जास्पद भाषेत कर्णधाराची खिल्ली

गेल्या काही दिवसांपासून खेळाडू फिटनेसमुळे ट्रोल होत आहेत.

‘फादर्स डे’ला मॅन्चेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने विश्वचषकात पाकिस्तानला सलग सातव्यांदा पराभवूत केलं. भारताबरोबर झालेल्या पराभवानंतर क्रिडा विश्वातून पाकिस्तान संघावर टीका केली गेली. नाणेफेकीपासून क्षेत्ररक्षणापर्यंत पाकिस्तानी संघावर टीका केली. भारताबरोबरच्या मानहानीकारक पराभवानंतर पाकिस्तानी संघाला सोशल मीडियावर चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागले होते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. ज्यामध्ये पाकिस्तानी चाहत्याने कर्णधार सरफरजची खिल्ली उडवण्यासाठी लज्जास्पद भाषेचा वापर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

१५ सेंकदाच्या या व्हिडीओमध्ये सरफराज आपल्या मुलासोबत एका मॉलमध्ये आल्याचे दिसतेय. त्यावेळी एका चाहत्याने सरफराजला शिवराळ भाषेत जाड का होत चाललाय? असे विचारले. ‘ भाई, डुकरासारखा जाड कसा होत चाललाय? खूप मोठा झाला आहेस. पाकिस्तानचे नाव खूप मोठं केले. कमी डायट केल्यामुळे डुकरासारखे मोठा झाला असेल.’ अशा भाषेत खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही खेळामध्ये जय-पराजय असतो मात्र, देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूला अशा शिवराळ भाषेत विचारणा करणे कितपत योग्य आहे.

गेल्या काही दिवसांपासून खेळाडू फिटनेसमुळे ट्रोल होत आहेत. पाकिस्तानी चाहत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. पण काही चाहत्यानी या व्हिडीओवर नाराजी व्यक्त करत त्या चाहत्याला चांगलेच सुनावले आहे.

स्पर्धेतील पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या सुमार कामगिरीबद्दल कर्णधार सरफराझ अहमदसह संपूर्ण संघाला प्रचंड टीका सहन करावी लागत आहे. पाकिस्तानला पाच सामन्यांपैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी संघाविरोधातील टीकेची धार अधिक तीव्र झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2019 4:08 pm

Web Title: india pakistan fans unite to defend sarfaraz ahmed as harassment video goes viral nck 90
Next Stories
1 जिओ गिगाफायबरचे प्लॅन लिक; जाणून घ्या काय आहे किंमत?
2 २०८ कोटींची लॉटरी जिंकला! पण अर्धी रक्कम द्यावी लागणार विभक्त पत्नीला
3 Video : भारताने पाकवर विजय मिळवला आणि त्याने तिच्या हृदयावरही!
Just Now!
X