News Flash

Video : ‘पाकिस्तानला विश्वचषकाबाहेर करण्यासाठी भारत मुद्दाम पराभूत होणार’

भारत मुद्दाम श्रीलंका आणि बांग्लादेशविरुद्ध पराभूत होणार, डेव्हिड वॉर्नरने भारताविरोधात केलेल्या खेळीवर देखील प्रश्न उपस्थित

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकातील चुरस दिवसेंदिवस वाढत आहे. अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर गेलेत. ऑस्ट्रलिया आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीतील स्थान पक्क केलंय, तर भारताचा प्रवेश जवळपास निश्चित मानला जातोय. त्यामुळे आता चौथ्या स्थानासाठी रंगतदार स्पर्धा आहे पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड या तीन संघांमध्ये. या संघाना स्वतःचे सर्व सामने जिंकायचे आहेतच पण याशिवाय इतर संघानी पराभूत व्हावं अशी प्रार्थना देखील करावी लागणार आहे. यात सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे बेभरवशाचा संघ म्हणून ओळख असलेल्या पाकिस्तानची. याच दरम्यान, पाकिस्तानी संघाच्या एका माजी खेळाडूने भारतीय संघावर अत्यंत गंभीर आणि तितकेच हास्यास्पद आरोप केले आहेत.

पाकिस्तानी संघाचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठू नये यासाठी भारत मुद्दाम श्रीलंका आणि बांग्लादेशविरोधातील सामन्यात पराभूत होईल असा दावा केला आहे, तसंच डेव्हिड वॉर्नरने भारताविरोधातील खेळीवर देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना अली म्हणाले, ‘भारताने आतापर्यंत केवळ पाच सामने खेळलेत. पाकिस्तानने उपांत्य फेरीत पोहोचावं अशी इच्छा भारताची कधीच नसेल. त्यांचे उर्वरित सामने बांग्लादेश आणि श्रीलंकेविरोधात आहेत आणि अफगाणिस्तानविरोधात भारताने कसा खेळ केला हे तुम्ही सर्वानीच पाहिलंय. या संघांविरोधात भारतीय संघ मुद्दाम वाईट खेळेल पण अशाप्रकारे खेळेल की प्रेक्षकांना काय घडलंय हे कळणारच नाही’. भारताविरोधात खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर यानेही सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलं नाही असंही अली म्हणालेत. अली यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियातून विविध प्रतिक्रिया येत असून अनेकांनी हे विधान हास्यास्पद असल्याचं म्हणत पाकिस्तानी चाहत्यांना जोरदार ट्रोल केलं आहे.
पहा व्हिडिओ –

दरम्यान, बासित अली यांनी केलेल्या आरोपांवर भारताच्या कोणत्याही खेळाडूने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 10:07 am

Web Title: india will lose purposely against bangladesh and sri lanka to oust pakistan from wc sas 89
Next Stories
1 ‘भारताला जो हरवेल तोच वर्ल्ड कप जिंकेल’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं मोठं विधान
2 It’s Not OK! बॉसच्या मेसेजला ‘ओके’ ऐवजी इमोजी पाठवणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची हकालपट्टी
3 VIDEO: ‘सांगा शेती करु कशी?’, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे मराठमोळे रॅप साँग व्हायरल
Just Now!
X