28 February 2021

News Flash

प्रतिष्ठित ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेवर पुन्हा एकदा भारतीय मोहोर!

'स्पेलिंग बी' स्पर्धेत भारतीय वंशाच्या कार्तिकनं बाजी मारली आहे. कार्तिक १४ वर्षांचा आहे. गेल्यावर्षी ही स्पर्धा अनन्या विनय या १२ वर्षांच्या मुलीनं जिंकली होती.

स्पेलिंग बी स्पर्धेत जवळपास ५१६ स्पर्धक सहभागी झाले होते. अंतिम स्पर्धेत न्यासा आणि कार्तिक या दोघांमध्ये अटीतटीचा सामना रंगला.

अमेरिकेत अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत भारतीय वंशांच्या कार्तिक नेम्मानी या १४ वर्षांच्या मुलानं बाजी मारली आहे. कार्तिक मुळचा टेक्सास येथे राहणारा आहे. आठवीत शिकणाऱ्या कार्तिकनं भारतीय वंशांचा प्रतिस्पर्धी न्यासा मोदीला हरवून अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार पटकावला आहे.

स्पेलिंग बी स्पर्धेत जवळपास ५१६ स्पर्धक सहभागी झाले होते. अंतिम स्पर्धेत न्यासा आणि कार्तिक या दोघांमध्ये अटीतटीचा सामना रंगला अखेर ‘koinonia’ या शब्दाची अचूक स्पेलिंग सांगून कार्तिकनं या प्रतिष्ठित पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. गेल्या काही वर्षांपासून ही स्पर्धा भारतीय वंशाचे अमेरिकन विद्यार्थी जिंकत आहेत.

ही स्पर्धा जिंकल्यानंतर कार्तिकला २००० अमेरिकन डॉलर रोकड, न्यूयॉर्क आणि हॉलिवूडची ट्रिप आणि शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पिझ्झा पार्टी असं बक्षिसही मिळणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत ११ ते १४ वर्षे वयोगटातील १६ स्पर्धक होते. ज्यात ९ मुली आणि ७ मुलांचा सहभाग होता. ‘माझ्यात आत्मविश्वास होता पण मी ही स्पर्धा जिंकेल असं मला वाटलं नव्हतं. ही स्पर्धा जिंकून माझं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं आहे असं मला वाटू लागलं आहे’ अशी प्रतिक्रिया कार्तिकनं स्पर्धा जिंकल्यानंतर दिली. गेल्यावर्षी ही स्पर्धा अनन्या विनय या १२ वर्षांच्या मुलीनं जिंकली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 12:14 pm

Web Title: indian american boy karthik nemmani wins national spelling bee title
Next Stories
1 Video : विदेशी असूनही भारतीय भाषेचा अभिमान, मग आपल्याला का नाही?
2 ..म्हणून मेगन आणि प्रिन्स हॅरी लग्नात आलेल्या कोट्यवधी किंमतीच्या भेटवस्तू करणार परत
3 फेकन्युज : ‘फोटोशॉप्ड्’ ट्वीट मेवानींच्या अंगलट
Just Now!
X