क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर ११९ धावांनी मात केली. या विजयासहीत इंग्लंडने उपांत्य फेरीतील जागा निश्चित केली आहे. मात्र इंग्लंडच्या या विजयामुळे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे पाकिस्तान संघाचे स्वप्न जवळजवळ भंग पावले आहे. न्यूझीलंडच्या पराभवामुळे पाकिस्तानने उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची शक्यता खूपच कमी झाली आहे. शुक्रवारी पाकिस्तानचा बांगलादेशविरुद्ध सामना होणार आहे. मात्र या सामन्यामध्ये पाकिस्तानने नाणेफेक हरला आणि बांगलादेशने फलंदाजी घेतली तर पाकिस्तान संघ विश्वचषक स्पर्धेबाहेर जाईल. किंवा पाकिस्तानला बांगलादेशला अगदीच मोठ्या पण अशक्य वाटणाऱ्या फरकाने पराभूत करावे लागेल तेव्हाच त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल. मात्र सध्या बांगलादेश संघाची कामगिरी पाहता पाकिस्तानचा प्रवास उद्याच्या सामन्यापुरताच असणार आहे हे जवळजवळ निश्चित झाले आहे. यावरुनच आता पाकिस्तानी संघाला भारतीय चाहत्यांनी ट्रोल केले आहेत. भारतामध्ये #PAKvBAN हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहे. अनेकांनी हा हॅशटॅग वापरून पाकिस्तनी संघाला ट्रोल केले आहे. पाहूयात असेच काही व्हायरल ट्विटस…

१)
पाकिस्तानी संघाची परिस्थिती

२)
पाकिस्तानचे प्रयत्न

३)
या दोन शक्यता

४)
शुक्रवारचा सामना पाहताना पाकिस्ताने चाहते

५)
हेच बाकी होतं

६)
यंदा नाहीच

७)
असं केलं तर

८)
आम्हाला काही किंमत आहे की नाही

९)
असे पोहचू शकतात उपांत्य सामन्यात

१०)
चला घरी

११)
कोणाचं काय तर कोणाचं काय

१२)
पाकिस्तानी म्हणतात तर आपणच असतो

१३)
तेव्हा आणि आता

१४)
एवढ्या विकेट

१५)
कोणी ९२ च्या विश्वचषकाबद्दल बोललं तर…

१६)
बाप म्हण बाप

१७)
अर्थव्यवस्था आणि पाकिस्तानी संघ

१८)
हाच वर्ल्डकप

१९)
पाकिस्तानची स्वप्न हवेत

२०)
बांगलादेश टीमला कोंडून घ्या

२१)
काय ते समजून घ्या

२२)
आधी इंग्लंड सोडणारा संघ कोणता

२३)
जेव्हा पाकिस्तानला आजच्या शक्यता सांगितल्या

२४)
९२ च्या विश्वचषकाचं भूत पाकिस्तानमध्ये परत आलं

२५)

शेवटचा सल्ला

दरम्यान, बुधवारी झालेल्या सामन्यानंतर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील तीन संघांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. ऑस्ट्रेलियाबरोबरच बांगलादेशला हरवून भारताने उपांत्या फेरीचे तिकीट पक्का केल्यानंतर काल इंग्लंडने उपांत्य फेरीत प्रवेश केला. न्यूझीलंडचा पराभव करुन इंग्लंड उपांत्य फेरीत जाणारा तिसरा संघ ठरला आहे. न्यूझीलंडचा पराभव झाला असला तरी पाकिस्तानला नेट रनरेटमध्ये त्यांनी मागेच टाकले आहे. त्यामुळे उपांत्य फेरीतील चौथा संघ न्यूझीलंडच असणार आहे. मात्र पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चमत्कार घडवलाच तर ते उपांत्य फेरीत दाखल होती. मात्र या चमत्काराची स्वत: पाकिस्तानलाही अपेक्षा नसल्याचे पाकिस्तानच्या माजी खेळाडूने सांगितले आहे. त्यामुळे आता उद्याच्या सामन्यानंतर उपांत्य फेरीतील चौथ्या संघाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.