09 March 2021

News Flash

घर कब आओगे! जवानांना निरोप देताना कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रुंचा पूर; पुण्यातील Video Viral

रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी ट्विटरवर जवानांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रेल्वे मंत्र्यांनी ट्विटरवर पोस्ट केलेला हा व्हिडीओ पुण्यातील खडकी या रेल्वे स्थानकावरील आहे. भारतीय जवान आपलं कर्तव्य बजावण्यासाठी सीमारेषेवर निघाले असताना कुटुंबीयांची होणारी अवस्था आणि त्यांच्या डोळ्यातून वाहणारा अश्रुंचा पूर या व्हिडीओतून दिसतेय. हा भावनिक व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणीही आले आहे.

नेटकऱ्यांनी जवानांच्या या बलिदानाला सलाम केला आहे. रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत तूम्ही पाहू शकता की, खडकी स्थानकावरुन जवान रेल्वे मार्गे कर्तव्यावर निघाला आहे. निरोप देण्यासाठी कुटुंबीय रेल्वे स्थानकावर आले आहेत. जवान रेल्वेत चढल्यानंतर कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू येतात. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला वाजणारे गाणं या क्षणाला आणखी भावनिक बनवते.

रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी हा व्हिडीओ १९ जुलै रोजी आपल्या अधिकृत ट्विटरवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावनिक झाले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त जणांनी पाहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 4:09 pm

Web Title: indian army soldiers family see them off at pune railway station piyush goyal tweets emotional video nck 90
Next Stories
1 हॉरर, विनाश, एलियन्स या विषयांवरील चित्रपट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, संशोधक म्हणतात…
2 गायीनं श्वानाच्या पिलांना केलं स्तनपान; व्हायरल व्हिडीओनं जिंकली मनं
3 Best Couple : ‘हे’ दोघं चार वर्षांपासून एकत्र फिरतात; फोटोग्राफरनेच सांगितला व्हायरल फोटोचा किस्सा
Just Now!
X