30 October 2020

News Flash

भारतीय लष्कर अशा प्रकारे करते हँड सॅनेटायझिंग, सोशल मीडियावर व्हिडओ व्हायरल

गौतम गंभीरने हा व्हिडीओ शेअर केला आहे

करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी देशातील ३० राज्य लॉकडाउन करण्यात आली आहेत. तसेच खोकताना व शिंकताना रुमालाचा वापर करा, हात साबणाने किंवा सॅनेटायझरने स्वच्छ करा असे संदेश देण्यात येत आहेत. जनजागृती करणारे संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कलाकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहे. अशातच भारतीय लष्कराने हात स्वच्छ धुण्यासाठी एक नवी मशिन तयार केली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भारताचा माजी आघाडीचा फलंदाज गौतम गंभीरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय लष्कराने हात स्वच्छ धुण्यासाठी एक नवी मशिन बवनल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने ‘सुपरकूल हॅन्ड सॅनिटायझिंग मशिन’ असे कॅप्शन दिले आहे.

व्हिडीओमध्ये एक जवान मशिनबाबत माहिती देत आहे. तसेच दुसरा जवान ती मशिन कशी वापरायची याची माहिती देत आहे. व्हिडीओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही मशिन लष्कराचे हेडक्वार्टर एसएमटी वर्कशॉपमध्ये तयार करण्यात आले आहे. या मशिनद्वारे हॅन्डवॉश किंवा पाण्याच्या नळाला हात न लावता स्वच्छ हात धुतले जात आहेत. त्यामुळे मशिनला हँड फ्री मॅकेनिजम म्हटले जात आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे.

करोना व्हायरसमुळे देशातील ३० राज्यांमध्ये लॉकडाउन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद आहे. देशात ही स्थिती ३१ मार्चपर्यंत कायम राहणार आहे. ट्रेन, बस सेवा बंद असल्यामुळे दैनंदिन रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे हाल होत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2020 7:17 pm

Web Title: indian army supercool hand sanitising mechanism video viral on social media avb 95
Next Stories
1 Coronavirus: खरी मर्दानी! २६३ भारतीय विद्यार्थ्यांना इटलीतून मायदेशी सुखरुप परत घेऊन आली
2 Jio Offer : नव्या युजर्सना फ्री ब्रॉडबँड, 10Mbps स्पीडसह मिळेल ‘डबल डेटा’ही
3 WhatsApp चं भन्नाट फीचर, मेसेजच्या समोर मिळेल हे ‘खास बटण’
Just Now!
X